सोन्याचांदीत घसरण US मधील घसरगुंडीचा कमोडिटीत फटका


मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर जागतिक सोन्याच्या दरपातळीत घसरण झाली. या महिन्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल अशी शक्यता असली तरी किती बीपीएसने होईल हे अनिश्चित असल्याने आजही सोन्यात अस्थिरता कायम होती. तसेच युएस बाजारातील कमुकवत रोजगार आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर व डॉलर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असल्याने आज सोने किरकोळ दराने स्वस्त झाले आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०८४८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९९४४ रूपये, १८ कॅरेटसाठी ८१३६ रूपयांवर पोहोचली आ हे.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति तोळा किंमतीतही घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या दरात १० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या दरात १० रूपये घसरण झाली. परिणामी प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०८४८० रूपया वर, २२ कॅरेटसाठी ९९४४० रूपये, १८ कॅरेटसाठी ८१३५० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १०८४७ रूपये, २२ कॅरेटसाठी ९९४४ रूपयांवर गेले आहेत.


जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात सकाळी ०.६५% घसरण झाली आहे. तर सकाळी जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०५% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Co mmodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.०१% वाढ झाल्याने सोने दरपातळी १०७७४० रुपयांवर पोहोचली आहे.


चांदीच्या दरातही घसरण !


आज औद्योगिक क्षेत्रातील सतत बदलत्या समीकरणामुळे आज चांदीत घसरण झाली आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीसह युएस बाजारातील घसरलेली रोजगार आकडेवारी अशा कारणांमुळे तसेच औद्योगिक मागणीसह घसरलेल्या स्पॉट बेटिंग मागणीमुळे आज चांदी घसरली.


'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने, प्रति किलो दरात १००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १२७ रूपये, प्रति किलो दर १२७००० रूपयांवर गेले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय सराफा बाजारातील चांदीचा प्रति १० ग्रॅम सरासरी दर १२७० रूपये, प्रति किलो दर १२७०० रूपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.११% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदी चा दर ०.७०% घसरल्याने एमसीएक्स दरपातळी १२३८२८.०० रूपयांवर पोहोचली आहे.


Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची