कॉर्पोरेट कंपन्यांचा बँकेतून कर्ज घेण्याकडे नकारात्मक कौल

प्रतिनिधी:आरबीआयच्या नव्या आकडेवारीनुसार, कॉर्पोरेट कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेण्यात घसरण झाली आहे. बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी या बँकांनी अपारंपारिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रित केल्याने बँकेकडून निधी उभारणीकडे कंपन्यांचा कल नसल्याचे निरि क्षण आरबीआयने नोंदवले आहे. याऐवजी कंपन्या कॉर्पोरेट बाँड, भांडवली बाजार (Capital Market), व इतर स्त्रोतांचा वापर करत आहेत. त्यामुळे आकडेवारीत पाहिल्यास यावर्षी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत या तिमा हीत १७% घसरण झाली आहे. ज्यामुळे या निधी उभारणीचे मूल्यांकन १७ ट्रिलियन रूपयांवर पोहोचल्याचे आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.


याखेरीज विना वित्त कंपन्यांनी (Non Financial Companies) मात्र इयर बेसिसवर निधी उभारणीत वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी तिमाहीत ही संख्या १.४ ट्रिलियन होती ती वाढत या तिमाहीत ३.८ लाख ट्रिलियन झाली आहे. तर विना वित्त कंपन्यांनी कॉर्पोरेट बाँड जारी करत आपल्या नव्या निधीत वाढ नोंदवली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ १८% झाली असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ही संख्या १.९ ट्रिलियनवर गेली असल्याचे आरबीआयने सांगितले. तसेच महत्वाच्या निरिक्षणानुसार, विना बँकिंग स्त्रोतातून निधी उभारणीत मोठी वाढ झाली आहे.


या प्रकारच्या अथवा विदेशी फंडिगमधून कंपन्यांनी ३३.५% वाढ नोंदवली असून घरगुती निधी स्त्रोतातून ३५% वाढ नोंदवली आहे. मात्र आरबीआयच्या आकडेवारीनुसार यावर्षी झालेली निधी उभारणी केवळ ३% ने वाढली आहे जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मंद वेगाने झालेली निधी उभारणीत वाढ आहे.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे