लालबागच्या राजामुळे मुंबईत विसर्जन मिरवणूक रखडली, तर पुण्यात तब्बल ३२ तासांनी मिरवणूक संपली!

पुणे: काल शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरातील सर्व दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील काही प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्त्यांची भव्यदिव्य मिरवणूक काढली जात असल्याकारणामुळे, त्यांचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी गिरगाव चौपाटीवर केले जाते. मुंबईतील या सर्व गणेशमूर्त्या अंदाजे सकाळी ९ वाजेपर्यंत विसर्जित केले जातात. मात्र यंदा लालबागचा राजाचे विसर्जन नियोजित वेळेमध्ये होऊ शकले नाही. आज संध्याकाळचे ७ वाजून गेले तरी लालबागचा राजा तराफ्यावरच चढवण्यात आला होता. समुद्राला आलेल्या तूफान भरतीमुळे लालबागचा राजाला विसर्जनासाठी आणखीन काही तास थांबावे लागणार असल्याचे, मंडळ सचिव सुधीर साळवी यांनी माहिती दिली. त्यामुळे या वर्षी मुंबईतली विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला २४ तास उलटून गेले तरी अद्याप संपली नसल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक संपली असल्याचे पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक २९ तास चालली होती, मात्र यावर्षी या मिरवणूका थोड्या उशिरा संपल्या आहेत. याबद्दल माहिती देताना, गणपती विसर्जनाचे सर्व कार्यक्रम पुण्यात शांततेत पार पडल्याची प्रतिक्रिया पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली आहे.


गणपती विसर्जनाच्या पर्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुण्यातील सर्व गणेश मंडळानी सहकार्य केले. मोठा बंदोबस्त १२ दिवसांपासून लावण्यात आला होता. सगळा सोहळा शांततेत पार पडला. सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन. गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश आल्याचे मत यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.


गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुण्यातली मिरवणूक उशिरा संपल्याबद्दल त्यांना प्रश्न केला असता, ते म्हणाले "किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाचं नाही. तर मधल्या वेळेत काही मंडळांचा मंडळांशी आक्षेप होता ते सोडवण्यात आले. प्रत्येक मंडळांना योग्य वेळ मिरवणुकीसाठी मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती. मिरवणूक उत्साहात पार पडली पाहिजे हे आमचे उद्दिष्ट होते, मत कुमार यांनी व्यक्त केले.



विसर्जनानंतर पुणे मेट्रोत तूफान गर्दी


गणेश विसर्जनाची रात्र पुण्यात जल्लोषात पार पडली. मिरवणूक पाहून झाल्यानंतर पुणेकरांनी घर गाठण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं. गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी खासगी वाहनं किंवा बसऐवजी मेट्रोचा सोपा पर्याय निवडला. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोत दाखल झाल्याने तुफान गर्दीची परिस्थिती निर्माण झाली.



पुण्यातील शेवटच्या गणपतीला निरोप, लालबागचा राजा अजून बाकी


पुण्यातील शेवटचा महाराष्ट्र्र तरुण मंडळाचा गणपती ४.३० वाजता टिळक चौकातून विसर्जन घाटावर मार्गस्थ झाला. त्याला भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुकीला पूर्णविराम देण्यात आला आहे. यावर्षी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक विक्रमी ३२ तास चालली आहे. मात्र मुंबईत वातावरण वेगळेच आहे. लालबागचा राजाचे विसर्जन रखडल्यामुळे गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी जमली आहे. मुंबईच्या भरतीमुळे राजाला समुद्रात घेऊन जाता येत नसल्याचे सूत्रांनी माहिती दिली असून, समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.



लालबागच्या राजाचं विसर्जन किती?


लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोळी बांधवांशी झालेल्या चर्चेनुसार रात्री साडेदहा नंतर विसर्जन होईल, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

जिंकलो रे!... भारताने कोरियाला ४-१ ने हरवून आशिया कप जिंकला

विश्वचषकासाठी पात्रता मिळवली राजगीर: बिहारमधील राजगीर येथे झालेल्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने

विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून,

मुंबईत यंदा एकूण १,९७,११४ गणेशमूर्ती विसर्जित

मुंबई: मुंबईतील समुद्रकिनारे (चौपाटी) तसेच नैसर्गिक स्थळं आणि २९० पेक्षा अधिक कृत्रिम तलावांच्या ठिकाणी

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

भटक्या कुत्र्यांची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, ज्येष्ठ नागरिकाला आणि चार मुलांना केले जखमी

बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी