विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून, चंद्रग्रहण सुरू होण्याआधी लालबागचा राजा समुद्रात लीन झाला. हा भावनिक क्षण लाखों भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. अशाप्रकारे, तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र काही निवडक गणपतींचे विसर्जन आज सकाळच्या प्रहरी गिरगांव चौपाटीवर करण्यात आले. मात्र लालबागचा राजाचे विसर्जन काही कारणांमुळे रखडले गेले होते. त्यांनंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला आणखीनच उशीर झाला होता, त्यामुळे समुद्राचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. दरम्यान लालबागचा राजाचे विसर्जन का रखडले? याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. तेव्हा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी समुद्राला आलेल्या भरतीचे कारण देत, रात्री १०.३० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र चंद्रग्रहणाचे सावट पाहता, त्याआधीच राजाचे विसर्जन करण्यात आले.


 



 

आज रात्री ९.५८ पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असल्याकारणांमुळे, लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणाच्या आधी होणे अपेक्षित होते, आणि याच कारणामुळे सायंकाळी ८.०० वाजता बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली.  शेवटची आरती करत राजाचा तराफा समुद्रात हलवला गेला. तराफा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याकारणामुळे अधिक वेळ न घेता,  सोईस्कररित्या राजाची मूर्ती समुद्रात आणली गेली, आणि अंदाजे रात्री ९.१० च्या जवळपास लालबागच्या राजाला समुद्रात लीन करण्यात आले.



चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद


आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. हे  चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११.४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्याने पाहता येऊ शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही वेळ  काळोख पसरण्यााची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारताचा जीडीपी ७.३ ते ७.५% दरम्यान राहणार - ग्रँट थॉर्नटन भारत

मुंबई: विख्यात आर्थिक सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटन भारतने भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७.३-७.५% वाढू

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

सेन्सेक्स १०७ व निफ्टी ४६ अंकाने कोसळला शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या