कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण अजित गावडे (वय १०) चे  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गणेश मंडपात मित्रांसोबत खेळत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली, म्हणून तो घरी पळत गेला, आणि त्याने आईच्या मांडीवर डोके टेकले. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कोडोली आणि परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण त्याच्या कुटुंबासह वैभव नगरमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी तो गणपती मंडळात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळताना अचानक त्याची तब्येत बिघडली म्हणून तो घरी पळत गेला. त्याच्या आईच्या कुशीत त्याने आपले डोक टेकले, पण काही कळेल तितक्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, श्रावणचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

श्रावणच्या अशा अचानक मृत्यूमुळे गावडे कुटुंबात शोककळा पसरली आहे. अजित गावडे यांना दोन मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची मुलगी चार वर्षांपूर्वीच वारली होती. आता त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने कुटुंबात आणि गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण शेजारच्या लोकांचा लाडका होता, त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचे सर्व कौतुक करत असत. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठी धक्कादायक असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

Maharashtra Rain Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट', राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच!

राज्यात पूरस्थिती गंभीर : मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा मुंबई : राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून,

Rain Update : ठाणे जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; प्रशासन सज्ज, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert)

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने