इम्रान खान यांच्या बहिणीवर फेकली अंडी!


इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगाबाहेर अलिमा खान पत्रकारांशी बोलत असताना ही घटना घडली जिथे तिचा भाऊ कैद आहे.


अलिमावर अंडी फेकल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले. त्यानंतर लगेचच खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्यावर अंडी फेकल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.


रावळपिंडी पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अटक केलेल्या दोन्ही महिला पीटीआय समर्थक आहेत. ज्या त्यांच्या अपूर्ण मागण्यांविरुद्ध निषेध करण्यासाठी ऑल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ग्रँड अलायन्सच्या इतर सदस्यांसह रावळपिंडी येथे आल्या होत्या.अलीमा यांनी दोन्ही महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्याने अंडी फेकण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.


पीटीआयने या घटनेचा निषेध केला आहे. आणि आरोप केला आहे की, पोलिसांनी महिलांना कारमधून पळून जाण्यास मदत केली. जी राजकीय हेतूंसाठी पाठवण्यात आली होती. पक्षाने म्हटले आहे की, महिलांना अलिमाच्या मीडिया ब्रीफिंगला अजेंडाचा भाग म्हणून पाठवण्यात आले होते.


Comments
Add Comment

फिलिपीन्सला भूंकपाचा मोठा तडाखा, अनेक इमारती कोसळल्या, २० जणांचा मृत्यू

मनिला: फिलीपीन्समध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप आला. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये

नाराजीचा स्फोट : अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे; आता पुढे काय होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजीचा स्फोट; बेरोजगारीच्या संकटात वाढ होण्याची भीती दुसऱ्या

पाकिस्तान : क्वेट्टामध्ये फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयाजवळ आत्मघातकी स्फोट

क्वेट्टा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे मंगळवारी दुपारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात दहा

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, भारतीय उच्चायोगाने घेतला तीव्र आक्षेप

लंडन: ब्रिटनची राजधानी लंडनमधील टाविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात

अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावणार - ट्रम्प

न्यूयाॅर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ