विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्यांचे व्हिडिओ तसेच फोटो काढण्यावर बंदी, पुणे पोलिसांचे कडक निर्देश

पुणे: पुणे पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी ४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित करणे तसेच ते सोशल मिडियावर सार्वजनिक करणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जेणेकरून गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि सार्वजनिक शांतता राखली जाईल हा त्यामागचा हेतू आहे.

भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. उद्या अनंत चतुर्दशी असून, शनिवारी पुण्यातील अनेक गणेश मूर्तींचे विसर्जन वेगवेगळ्या तलावात केले जाईल. त्यानंतर विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्यांचे अवशेष सोशल मिडियावर पोस्ट केले जातात, ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.

त्यामुळे पुणे पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली कडक कारवाई केली जाईल.
Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)

एकाच कुटुबांत दोघांना उमेदवारीची लॉटरी

विविध राजकीय पक्षांची एकाच कुटुंबावर मेहेरबानी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी