अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने अंत्ययात्रेची तयारी केली. परंतु हा तरुण जीवंत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. याबाबत रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडून खुलासा करताना सांगण्यात आले आहे की नातेवाईकांनी तरुण रुग्ण हा घरी नेत असल्याचे सांगितले तर जिल्हा रुग्णालयात या तरुणावर आता नव्याने उपचार केले जात आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी त्रंबकेश्वर तालुक्यातील युवक दुचाकीहून घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला त्रंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी अधिक उपचारासाठी या तरुणाला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे करण्यात आले. परंतु, शासकीय रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याकारणाने या आदिवासी परिवाराने या रुग्णाला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ.वसंत पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल केले. याठिकाणी तीन दिवस त्याच्यावरती उपचार करण्यात आले. डॉ.वसंत पवार रुग्णालयाच्यावतीने मेंदू मृत झाला आहे,असे सांगण्यात आले. त्याला घरी घेऊन जा किंवा या ठिकाणी उपचार करू द्या असे सांगितले.


परंतु नातेवाईकांनी याचा वेगळा अर्थ काढला आणि तरुण मृत्यू झाला म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात आणले गेले. तर दुसरीकडे मात्र नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली ही सर्व घडामोड घडत असताना या ठिकाणी तरुणाला खोकला आला आणि तरुण जिवंत असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत खुलासा करताना सांगितले आहे की सर्व परिवार हा रुग्णाला घरी घेऊन जात असल्याचे सांगितले, तशी नोंदही करण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालयाने खोकला आल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आल्याचे सांगून त्या पद्धतीने उपचार सुरू केल्याचे सांगितले आहे.


अपघातात जखमी झालेला तरुण भाऊ लचके याचे नशीब चांगले म्हणून ज्यावेळी अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. त्यावेळी खोकला आल्याने तो जिवंत असल्याचे लक्षात आले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता हे मात्र निश्चित केवळ प्रशासन आणि रुग्ण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याकारणाने अशा घटना घडत असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर

रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर

दुबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (२६ नोव्हेंबर) पुरुषांची फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या

मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात

मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या एस ब्यु टी क्लस्टर १

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

गुवाहाटी : भारताच्या कसोटी संघाला दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत ४०८ धावांनी पराभूत करत मालिका २-०

आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मृतांचे आधार क्रमांक केले निष्क्रीय

मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या