माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांचा फेस्टिव्ह मूड सध्या ऑन आहे. इतरांप्रमाणे त्या देखील गणेशोत्सवाचा आनंद घेताना दिसून येत आहे. दरम्यान, अमरावतीच्या नवसारीतील जवाहर नगर येथील अष्टविनायक गणेश मंडपात त्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मंडळात पूजा आणि आरती सुरू होती. ढोल-ताशांचा गजर आणि गणपतीची आरती या भक्तीमय वातावरणामुळे मंडळामधील वातावरण उत्साही झाले होते. त्यामुळे, नवनीत राणा स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या थेट ढोल पथकात सामील झाल्या.
अमरावती, महाराष्ट्र: भाजपा नेता नवनीत रवि राणा ने गणेश उत्सव समारोह में ढोल बजाया pic.twitter.com/gT8cPfEpQv
— IANS Hindi (@IANSKhabar) September 4, 2025
नवनीत राणा यांनी ढोलाच्या तालाशी लय जुळवत संपूर्ण उत्साहाने ढोल वाजवला. त्यांची ही वेगळी बाजू पाहून मंडळामध्ये उपस्थित असलेले सर्वजण उत्साहित झाले. कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवून त्यांच्यासोबत गणेश आरतिचा आनंद घेतला.
नवनीत राणा यांचा ढोल वाजवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये सामान्य लोक, नेते आणि कलाकार देखील पूर्ण भक्तीने सहभागी होतात. अशा प्रसंगी नेत्यांचे जनतेमध्ये येणे-जाणे सामान्य आहे, परंतु नवनीत राणा यांच्या ढोल वाजवण्याच्या अनोख्या शैलीवर अमरावतीकर प्रचंड खुश झालेले दिसून येत आहे.
सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. अनेक युजर्सनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हंटले की, नेत्यांनी अशा प्रकारे थेट जनतेशी जोडले पाहिजे. थोडक्यात काय नवनीत राणा यांच्या ढोल वादनाने अमरावतीकरांचे मन जिंकले.