राहुल देशपांडेनंतर आता 'या' अभिनेत्रीचा देखील मोडला संसार

 'संगीत देवबाभळी' नाटकातील अभिनेत्रीचा घटस्फोट


Marathi Actress Shubhangi Sadavarte Divorce: प्रसिद्ध मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडेच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच आता आणखीन एका मराठी अभिनेत्रीने घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे.


राहुल देशपांडे तब्बल १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नी नेहापासून विभक्त झाला. त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. पण याबरोबरच आता मराठी मनोरंजन विश्वातून आणखीन एका घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 'संगीत देवबाभळी' नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने देखील पती आनंद ओकसोबत घटस्फोट घेतला असल्याची चर्चा रंगत आहे.



पतीने पोस्ट करत दिली माहिती


याबाबत शुभांगीच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. या दोघांनी सामंजस्यानं हा निर्णय घेतल्याचं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


आनंद ओक हे देखील नावाजलेले संगीतकार आहेत. आनंद ओक यानं सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिळे की, "प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला. पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही एकत्र जे क्षण घालवले आहेत त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात आम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच एकत्र काम करू जसं यापूर्वीही एकत्र काम केलं आहे."


शुभांगीचे 'संगीत देवबाभळी' हे नाटक सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे. या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल सुरू असून, यात ती साकारत असलेली आवलीची भूमिका कौतुकास पात्र ठरत आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.