जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा करत असताना, दुसरीकडे कॉँग्रेसने सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे. ज्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.


काल नवी दिल्ली येथे जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या जीएसटी सुसूत्रीकरणाच्या माध्यामातून जीएसटी दराचे दोन टप्पे वगळून ते ५ टक्के आणि १८ टक्के असे करण्यात आले आहेत. यामुळे अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तू, शेतीच्या वस्तू, हरित ऊर्जा, लहान कार आणि सायकली यासह अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहेत. हे नवे कर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे, ज्याचे स्वागत संपूर्ण देशाने केले आहे. मात्र कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे त्याला विरोधच दर्शवला आहे.


काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये आठ वर्षे उशिराने सुसूत्रीकरण आणले आहे. बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर अंदाज लावत, या अचानक उचललेल्या पावलामागे काय कारण आहे, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे. ज्यावर नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर देत, टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.



काय म्हणाले पंतप्रधान?




मोदी म्हणाले की, “मी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी, स्वयंपाकघरातील भांडी असोत किंवा शेतीच्या वस्तू असोत, औषधे असोत किंवा अगदी जीवन विमा असोत, काँग्रेस सरकारने अशा विविध गोष्टींवर वेगवेगळे कर लादले होते.” ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी घरे बांधणे देखील कठीण केले होते. कारण ते सिमेंटवर २९ टक्के कर आकारत होते. याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी प्रवास आणि पर्यटनही खूप कठीण बनवले होते. ते हॉटेलच्या खोल्यांवर १४ टक्के आकारायचे. त्यांनी एअर कंडिशनर, टेलिव्हिजन आणि, पंखे यासारख्या वस्तूंवरही ३१ टक्के कर लादला होता.”


काँग्रेसवर घणाघात करताना मोदी पुढे म्हणाले की, "देशातील कोट्यवधी लोकांची प्राथमिक गरज असलेल्या साध्या सायकलवर कॉँग्रेस १७ टक्के कर आकारत असत. याचबरोबर लाखो माता आणि बहिणींसाठी स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या शिलाई मशीनवरही काँग्रेसने १६ टक्के कर लादला होता”,

Comments
Add Comment

बाथरूममध्ये सापडल्या ४० मुली! बेकायदेशीर मदरशाचे छांगूर बाबाशी कनेक्शन

लखनऊ : लखनऊजवळील बहराईच जिल्ह्यातील पयागपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवारी

कोणावर अवलंबून राहणे परवडणारे नाही

पंतप्रधान मोदी यांचे स्वाबलंबी बनण्याचे आवाहन; नोएडात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन नोएडा :

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): गेल्या काही दिवसांपासून मत्तचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे

पंतप्रधानांनी केली अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी

बांसवाडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या या आदिवासी-बहुल प्रदेशात २८०० मेगावॅटच्या अणुऊर्जा

ऐन दिवाळीत साखरेचे भाव वाढणार

नवी दिल्ली : ऐन दसरा, दिवाळीत साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने यंदाचा देशांतर्गत साखर