नवी दिल्ली: जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक बुधवारी नवी दिल्ली येथे पार पडली. बैठकीदरम्यान जीएसटी स्लॅब आणि जीएसटी दरांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये सामान्य जनता, शेतकरी आणि कामगार वर्गाला थेट दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला देशात लागू असलेल्या १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी २८ टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता केवळ १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी १२ टक्के जीएसटी लागायचा, त्यावर आता फक्त ५ टक्के जीएसटी लागणार आहे. तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.
लोकांच्या जिवनावश्यक वस्तूंवर कर कपात, काय होणार स्वस्त?
ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी सामान्य लोकांच्या जिवनावश्यक वस्तूंवर कर कपात करत, देशवासियांना दसरा दिवाळीपूर्वीच बंपर धमाका दिला आहे. तर या निर्णयामुळे कोणत्या गोष्टीला किती कर आणि कोणती गोष्ट करमुक्त करण्यात आली आहे? ते जाणून घेऊया.
शालेय वस्तू, दूध ते विमा पॉलिसीवर शून्य टक्के जीएसटी
आरोग्य विमा, पनीर, दूध, पराठा, चपाती, तंदूर रोटी, पिझ्झा, जीवनरक्षक औषधे, . गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं, शालेय वस्तु, ग्लोब
हेअर ऑइल, साबण, सायकलवर ५% जीएसटी
सीतारामन यांनी सांगितले की, यूएचटी दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा आता शून्य जीएसटी स्लॅबमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे यावर आता कुठलाही जीएसटी लागणार नाही. सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या वापरातील वस्तू – हेअर ऑइल, साबण आणि सायकलवर जीएसटी दर ५% करण्यात आला आहे.
तर कार, बाईक आणि सिमेंटवर आता २८ % ऐवजी १८ % जीएसटी लागू होणार आहे. तसेच टीव्हीवरील जीएसटीही २८ % वरून १८ % करण्यात आला आहे.
लक्झरी गाड्या आणि यॉट्सवर ४०% कर, कोणत्या गोष्टी झाल्या महाग?
लक्झरी श्रेणीतील वस्तूंवर कुठलीही सवलत दिली जाणार नाही. त्यानुसार मिड-साइज आणि मोठ्या कार, ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या मोटारसायकली, खासगी वापरासाठीचे विमान, हेलिकॉप्टर तसेच मनोरंजनासाठी वापरण्यात येणारे यॉट्स आणि जहाजे यांच्यावर थेट ४०% जीएसटी लागू होईल.
‘सिन गुड्स’ आणि सॉफ्ट ड्रिंक्सही महागले आहेत. ज्यामध्ये पानमसाला, सिगारेट, गुटखा, बीडी आणि इतर तंबाखू उत्पादने यांच्यावर आता ४०% कर लागू होईल. हीच दरमर्यादा सर्व प्रकारच्या शीतपेयांवर आणि गैर-मादक पेयांवर लागू होईल. यामध्ये साखर किंवा स्वीटनर असलेले ड्रिंक्स, फ्लेवर्ड आणि कॅफिनयुक्त पेय, कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसमिश्रित कार्बोनेटेड बेव्हरेजेसचा समावेश आहे.