अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतूसह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाहनांना ठराविक मार्गांवरून प्रवास करताना टोल नाक्यांवरून सूट देण्यात आली आहे.  त्यानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोणत्या इलेक्ट्रिक चारचाकी व बस वाहनांना टोल करातून सूट दिली जाणार आहे ते पाहूया.



या श्रेणीतील वाहनांना मिळणार टोल माफी



  • M2, M3, M6 श्रेणीतील इलेक्ट्रिक चारचाकी वाहने

  • इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील


वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग व मार्गावरील टोल नाक्यांवरून टोल कर भरण्यापासून सूट राहील. ही सूट दिनांक २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे. शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात