नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा व्हिसा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.तसा नियम केंद्र सरकारने केला आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, “इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (नागरिकत्व) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर, भारतीय नौदल, लष्कर किंवा हवाई दलातील सदस्य, जे कर्तव्यावर भारतात प्रवेश करतात किंवा सोडतात, त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, अशा सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य जेव्हा अशा व्यक्तीसोबत सरकारी वाहनातून प्रवास करतात तेव्हा त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.” असे म्हटले गेले आहे. या आदेशात भर टाकत , “भारतीय नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा नेपाळी किंवा भूतानचा नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा वैध पासपोर्ट असेल आणि नेपाळ किंवा भूतान व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणाहून भारतात प्रवेश करत असेल किंवा बाहेर पडत असेल तर भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वैध पासपोर्ट किंवा इतर वैध प्रवास दस्तऐवज आणि वैध व्हिसा आवश्यक राहणार नाही.”असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. “पण ही सूट चीन, मकाऊ, हाँगकाँग किंवा पाकिस्तानमधून प
मंत्रालयाच्या मते, जर त्यांनी १९५९ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या विशेष प्रवेश परवान्यावर,३० मे २००३ पूर्वी भारतात प्रवेश केला असेल किंवा जर त्यांनी ३० मे २००३ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या नवीन विशेष प्रवेश परवान्यावर केंद्राने नियुक्त केलेल्या भारत-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन चेकपॉईंटद्वारे कायदा सुरू होण्याच्या तारखेपर्यंत भारतात प्रवेश केला असेल तर देखील ही तरतूद लागू होईल.