Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानात राजकीय रॅलीनंतर बॉम्बस्फोट, १४ जण ठार तर ३५ जण जखमी

कराची: पाकिस्तानमध्ये दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोटाच्या घटना घडत आहेत. त्यानुसार काल रात्री पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे बलुच नॅशनल पार्टी (BNP) च्या राजकीय रॅलीनंतर बॉम्बस्फोट झाला. सरदार अत्ताउल्ला मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीनंतर लगेचच मोठा बॉम्बस्फोट झाला. रॅली संपल्यानंतर लोक पार्किंग क्षेत्रातून बाहेर पडत असताना शाहवानी स्टेडियमजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. ज्यामध्ये १४ ठार आणि ३५ जखमी झाल्याचे वृत्त आहे.



पार्किंग क्षेत्रात मोठी नासधूस


बॉम्बस्फोट इतका भीषण होता की रॅलीच्या ठिकाणाजवळील पार्किंग क्षेत्रात मोठी नासधूस झाली. या स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी काहीजणांनी जागीच प्राण सोडला. तर काहीजणांना रुग्णालयात नेत असताना मृत्यूने कवटाळले.  या बॉम्बस्फोटात एकूण ३५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  जखमींमध्ये माजी पाकिस्तानी खासदार अहमद नवाज आणि पक्षाचे नेते मुसा बलोच यांचाही समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



प्रकरणाचा तपास सुरू 


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, बलुच नॅशनल पार्टीचे नेते सरदार अत्तउल्ला मेंगल यांचे पुत्र सरदार अख्तर मेंगल यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. हा हल्ला बीएनपी नेते मेंगल आणि त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून करण्यात आला. तथापि, मेंगल या हल्ल्यातून सुरक्षितपणे बचावले. पोलिसांच्या मते, हा संशयित आत्मघातकी हल्ला असल्याचे दिसून येत आहे, परंतु त्याची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या

Iran-US-Israel War : इराणचा सौदीतील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र हल्ला; हवेत इंधन भरणारी ५ टँकर विमाने नुकसानग्रस्त

- अमेरिकेचे हजारो कोटींचे नुकसान इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे

North Korea Ballistic missile : इराण - अमेरिका युद्धात उत्तर कोरियाची एन्ट्री ?

- उत्तर कोरियाने सोडल्या १० बॅलेस्टिक मिसाईल इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा १५ वा दिवस

US-Israel vs Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा: इराणच्या खर्ग बेटावर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला!

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या लष्करी कारवाईची

इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने दोन आठवड्यात गमावली चार विमानं

वॉशिंग्टन डीसी : इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने दोन आठवड्यात चार विमानं गमावली आहेत. यूएस आर्मीचे हवेतल्या

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

- अफगाण या हल्ल्याचे उत्तर नक्कीच देईल : हमदुल्लाह फितरत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील