गुंतवणूकदारांनो सेबीचे 'हे' नवे नियम वाचलेत का? सेबीकडून इक्विटी डेरिएटिव्हजसह F&O एक्सपायरी नियमात फेरबदल !

प्रतिनिधी:सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने काही नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत. त्यानुसार इक्विटी डेरिएटिव्हज (Equity Derivates) संदर्भात नियमावलीत फेरबदल करण्याचे संकेत नियमन (Regulatory) संस्था सेबीने दिले.युएस ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटकडून बाजारात गैरहाताळणीचा (Manipulation) चा प्रकार घडल्यानंतर सेबीने या कंपनीवर बंदी घातली होती. दंड भरण्याच्या आधारे व काही अटीशर्तींसह सेबीने आता जेन स्ट्रीटला परवानगी दिली असली तरी शेअर बाजारात वारंवार तत्सम गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सेबीने काही धोरणात्मक पाऊले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून सेबीने सोमवारी नवी नियमावली जाहीर केली. निर्णयानुसार, इंट्राडेवरील निव्वळ पोझिशन मर्यादा (Net Position Limit) हे ५००० कोटी प्रति इंडेक्स ऑप्शन्स केले गेले आहे. यापूर्वी ही मर्यादा १५०० कोटी रूपये होती. स्थूल इंट्राडे (Intraday) एक्स्पोजर आता १०००० कोटी कॅपवर मर्यादित केले गेले आहे. सेबीच्या निर्णयानुसार, लॉंग व शॉर्ट अशा दोन्ही प्रकारच्या पोझिशनवर आता हे एक्स्पोजर १०००० कोटींपर्यंत लागू असणार आहे. याविषयी सेबीने नेमक्या शब्दात म्हटले आहे की,' दिवसाच्या आत एकूण गुंतवणूक मर्यादा १०००० कोटी इतकी मर्यादित करण्यात आली आहे, जी दीर्घ आणि लहान स्थितींसाठी स्वतंत्रपणे लागू केली जाते. शेअर बाजार ट्रेडिंग दिवसादरम्यान किमान चार स्नॅपशॉट वापरून अनुपालनाचे (Regulatory) निरीक्षण करतील, ज्यामध्ये दुपारी २.४५ ते ३.३० दरम्यानचा एक स्नॅपशॉट समाविष्ट आहे, जेव्हा ट्रेडिंग व्यवहार सामान्यतः सर्वाधिक उच्च पातळीवर अथवा अस्थिर असतो असे त्या त म्हटले आहे.'


मर्यादा ओलांडणाऱ्या संस्थांसाठी, स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग पॅटर्न तपासणार आहेत. आणि माहितीनुसार अशा स्थितींसाठी स्पष्टीकरण बाजार मागू शकतात. कॉन्ट्रॅक्ट डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीच्या दिवशी मर्यादा भंग केल्यास दंड आकारला जाईल, असे सेबीने म्हटले आहे, दंडाची रक्कम स्टॉक एक्सचेंज ठरवणार आहेत असे या अधिनियमात नमूद केले गेले आहे. बाजार नियामक सेबीने इक्विटी इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जमधील इंट्राडे पोझिशन्सवर देखरेख ठेवण्यासाठी नवीन चौकट (Framework) आणले आहे कारण त्यांचा उ द्देश मोठ्या एक्सपोजरमुळे होणारे शेअर बाजारातील धोके रोखणे आहे. १ ऑक्टोबरपासून लागू होणारी ही नियमावली सर्व ट्रेडिंग दिवसातील तासांवर मार्केट मेकिंग हालचाली सुलभ करेल आणि सुव्यवस्थित ट्रेडिंगसाठी एक्सपायरी डेला आउटसाईज्ड इंट्राडे पो झिशन्स तयार करण्यावर नियंत्रण ठेवेल' असे सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या निर्णयामागे आपला उद्देश स्पष्ट करताना सेबीने म्हटले आहे की,ऑपरेशनल स्पष्टता आणि ट्रेडिंगची सुलभता आणि जोखीम व्यवस्थापन यांच्यात योग्य संतुलन प्रदान करते. ही चौ कट फक्त इंडेक्स ऑप्शन्सपुरती मर्यादित असेल.


सेबीचा नवीन नियम ट्रेडिंग दिवसादरम्यान वैयक्तिक संस्थांद्वारे धारण केलेल्या मोठ्या ट्रेडिंग पोझिशन्सवर देखरेख करेल. यामुळे जास्त जोखीम घेण्यास आणि बाजार सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.सेबीने एक्सपायरी डेला इंडेक्स ऑप्शन्समध्ये काही संस्थांनी तयार केलेल्या आउटसाईज्ड इंट्राडे फ्युचर इक्विव्हॅलेंट (FutEq) किंवा डेल्टा इक्विव्हॅलेंट पोझिशन्सच्या वाढत्या घटना पाहिल्यानंतर नवीन नियम जारी केले आहेत, ज्यामुळे अस्थिरता आणि बाजाराच्या अखंडतेला धोका निर्माण होतो. अशाच एका प्रकरणात से बीने अमेरिकेतील हेज फंड जेन स्ट्रीटला भारतीय सिक्युरिटीज मार्केटमधून तात्पुरती बंदी घातली होती कारण त्यांनी रोख, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये एकाच वेळी पैज लावून चांगले नफा मिळवल्याचे यापूर्वी आढळून आले होते.


सेबीकडून आठवडी एक्स पायरी नियमावलीतही बदल !


सेबीने आपल्या आठवड्याच्या आधारे असलेल्या दोन्ही बाजारासाठी एक्सपायरी (Weekly Expiry) तारखांमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) एक्स्पायरीतील नव्या बदलानुसार एनएसईत (National Stock Exchange NSE) म ध्ये एक्सपायरीची तारीख गुरूवार बदलून मंगळवार करण्यात आली आहे.सेबीचा परिपत्रकानुसार, हा बदल २८ ऑगस्ट रोजी व्यवहार संपल्यापासून लागू झाला आहे सर्व करार नवीन आणि विद्यमान दोन्ही ओपन पोझिशन्स आता मंगळवार ही नवीन समाप्ती ता रीख म्हणून दर्शवितात.हा बदल निफ्टी साप्ताहिक, मासिक, तिमाही आणि सहामाही करारांसह बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिडकॅप निफ्टी, निफ्टी नेक्स्ट५० आणि सर्व सिंगल-स्टॉक डेरिव्हेटिव्ह्जसह विस्तृत श्रेणीच्या या सगळ्या करारांना लागू होत आहे.आताप र्यंत, साप्ताहिक निफ्टी आणि स्टॉक डेरिव्हेटिव्ह्ज दर गुरुवारी कालबाह्य होत असत, तर मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक करार समाप्ती महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी कालबाह्य होत असत.


तज्ञांच्या मते एकूणच,एनएसई गुंतवणूकदारांना त्यांच्या पदांचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक वेळ मिळाल्याने फायदा होईल, तर बीएसई कंत्राट व्यापाऱ्यांना कमी कालावधीचा सामना करावा लागेल ज्यामुळे गेल्या दोन दिवसांत बुधवार आणि गुरुवार तीव्र अ स्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.'

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील