शेअर बाजारातील सेक्टर्स...

डॉ. सर्वेश सुहास सोमण


शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या सेक्टर मधील आहेत. आज आपण ते सेक्टर कोणते आहेत ते बघूया. सोबत त्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या कोणत्या त्यांच्यावर परिणाम करणारे घटक कोणते ते जाणून घेऊ. शेअर बाजारातील विविध सेक्टर त्याची माहिती घेऊया… शेअर बाजारातील विविध "सेक्टर्स" म्हणजेच उद्योगांचे वेगवेगळे विभाग, जे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे गट असतात.


१. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र
उदाहरण : एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स
माहिती: बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या या सेक्टरमध्ये येतात.
गुणवैशिष्ट्ये : व्याजदरांवर परिणाम होतो. जीडीपी ग्रोथशी निगडीत असतो.


२. माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी सेक्टर)
उदाहरण : टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक
माहिती : सॉफ्टवेअर सेवा, आयटी सोल्युशन्स, बीपीओ, क्लाउड कम्प्युटिंग इ. सेवा पुरवणाऱ्या कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यावर प्रभाव. जागतिक मागणीवर आधारित.


३. औषधनिर्माण व आरोग्य सेवा
उदाहरण : सन फार्मा, डॉ. रेड्डीज, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल्स
माहिती: औषधे बनवणाऱ्या, हॉस्पिटल साखळ्या आणि डायग्नोस्टिक कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : संशोधन व पेटंट्स यावर अवलंबून. महामारी किंवा आरोग्याच्या समस्या यामुळे मागणी वाढते.


४. ऑटोमोबाईल क्षेत्र
उदाहरण : मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प
माहिती: कार, बाईक्स, ट्रक, आणि यांचे पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : कच्च्या मालाच्या किमती आणि ग्राहक मागणीवर आधारित. सरकारच्या धोरणांवर परिणाम होतो (ईव्ही पॉलिसी इ.)


५. एफएमसीजी-जलद गतीने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (दैनंदिन वापराच्या वस्तू)
उदाहरण : हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, डाबर, नेस्ले
माहिती : साबण, खाद्यपदार्थ, टूथपेस्ट, इत्यादी दैनंदिन वस्तू बनवणाऱ्या कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : डिफेन्सिव सेक्टर – मंदीतही चांगले परफॉर्म करतो. ग्राहकांवर अवलंबून.


६. ऊर्जा क्षेत्र
उदाहरण : रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एनटीपीसी, अदानी ग्रीन
माहिती : तेल, गॅस, विजेचा उत्पादन, सौर ऊर्जा वगैरे.
गुणवैशिष्ट्ये : कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून. सरकारच्या उर्जानितीवर परिणाम.


७. पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट
उदाहरण : एल अँड टी, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, आयआरबी इन्फ्रा माहिती: रस्ते, पूल, घरे, कार्यालये बांधणाऱ्या कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : सरकारच्या पायाभूत सुविधा खर्चावर अवलंबून. व्याजदराचा परिणाम होतो.
८. धातू व खाण क्षेत्र
उदाहरण : टाटा स्टील, हिंडाल्को, वेदांत, कोल इंडिया
माहिती: लोह, अॅल्युमिनियम, कोळसा इ. धातू व खनिजे काढणाऱ्या कंपन्या.
गुणवैशिष्ट्ये : जागतिक कमोडिटी मार्केटशी निगडीत. चीन व इतर देशांच्या मागणीवर प्रभाव.
९. दूरसंचार क्षेत्र
उदाहरण : भारती एअरटेल, जिओ (रिलायन्स), व्होडाफोन आयडिया
माहिती : मोबाइल नेटवर्क, डेटा सेवा, ब्रॉडबँड इ.
गुणवैशिष्ट्ये : स्पर्धा खूप आहे. एआरपीयू (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) महत्त्वाचा.


१०. दिर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू
उदाहरण : व्होल्टास, हॅवेल्स, व्हर्लपूल, बजाज इलेक्ट्रिकल्स
माहिती : टी.व्ही., फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, इत्यादी.
गुणवैशिष्ट्ये : शहरीकरण, उत्पन्न वाढ यावर प्रभाव. सणासुदीच्या हंगामात विक्री वाढते.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नाही)

Comments
Add Comment

Gold Rate Today: गेल्या दोन दिवसाची सोन्यातील घसरण कायम ६% दर कोसळले खरे मात्र... पुन्हा एकदा वाढीची संभावना?

मोहित सोमण: जागतिक भूराजकीय परिस्थितीत काहीशी शिथिलता आल्याने सोन्याच्या दरात गेले दोन दिवस मोठी घसरण झाली.

SBI Received Awards: एसबीआयला दोन जागतिक किर्तीचे पुरस्कार जाहीर पियुष गोयल म्हणाले..'२०२५ च्या सोहळ्यात...

प्रतिनिधी:जागतिक बँक असलेल्या आयएमएफच्या (International Monetary Fund IMF) वार्षिक बैठकीदरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात स्टेट

आयटी का धुमसतय? अमेझॉन युएसमध्ये ५ लाख कर्मचाऱ्यांना नारळ देणार मेटा कडूनही ६०० कर्मचाऱ्यांची कपात जाहीर 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: आठवड्याभरात आयटी शेअर अमेझॉनसह वॉल स्ट्रीटवर वाढले असले तरी मात्र ही रॅली शाश्वत नाही. अमेझॉन आपल्या

'प्रहार' Stock Market Closing: आयटीने वाचवले फायनान्सने काहीसे घालवले! अखेरच्या सत्रात तेजी घसरली 'या' कारणांमुळे सेन्सेक्स १३०.०६ व निफ्टी २२.८० अंक वाढीसह बंद

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात सुरूवातीच्या रॅलीला मात्र चाप बसला आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी ! १ नोव्हेंबरपासून बँक खात्याला ४ नॉमिनी ठेवणे शक्य होणार

प्रतिनिधी: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. पुढील महिन्यापासून, बँक ग्राहक संपूर्ण बँकिंग प्रणालीमध्ये

फक्त भाऊबीजेच्या दिवशी देशभरात २२००० कोटी रुपयांचा व्यापार झाला: CAIT

नवी दिल्ली: भाऊबीज हा दिवाळीतील महत्वाचा दिवस असतो. याच दिवाळी सारख्या महत्वाच्या उत्सवातील उलाढालीत एकट्या