जीएसटी कलेक्शनमध्ये ऑगस्ट महिन्यात थेट ६.५% वाढ कर संकलन नव्या उच्चांकावर

प्रतिनिधी:ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलनात (GST Collection) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६.५% वाढ झाली आहे. मागील वर्षी तिमाहीतील याच महिन्यात संकलनात वाढ १.७४ लाख कोटींवर होती यावर्षी हीच वाघ १.८६ लाख कोटींवर पोहोच ली आहे. त्यामुळे अस्थिरतेच्या काळातही ही मोठी वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेतील मजबूती अधोरेखित करत आहे. नुकतीच जीएसटी संकलनाविषयी सरकारी आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, ही वाढ ६.५% झाली असून केंद्र सरकार च्या जीएसटी संकलनात, राज्य सरकारच्या जीएसटी संकलनात, एकत्रित केंद्र व राज्य कर संकलनात (Integrated GST Collection) मध्ये मोठी वाढ झाली आहे.


आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर ९.९% वाढ झाली असून तब्बल संकलन १० लाख कोटीवर गेले आहे जे मागील वर्षाच्या याच कालावधीत ९.१३ लाख कोटी रुपये होते. तसेच या कालावधीतही केंद्र, राज्य, एकत्रित जीएसटी कर संकलनात वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीएसटी संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला होता ज्यामध्ये स्थूल संकलन (Gross Collection) २२.०८ लाख कोटींवर पोहोचले होते. त्यामागील आर्थिक वर्षाच्या ९.४% वाढ संकलनात झाली होती.


आर्थिक वर्ष २०१७ पासून मासिक वाढ ही १.८४ लाख कोटींवर नोंदवली गेली आहे. हळूहळू हे संकलन सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये असलेले ११.३७ लाख कोटी कर संकलन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २०.१८ लाख कोटींवर पोहोचले आहे. सध्या जीएसटीत होणारी सातत्याने वाढ ही मजबूत अर्थव्यवस्थेतील वाढलेल्या उपभोग खर्चामुळे (Personal Consumption) असून वाढलेल्या मागणीमुळे सातत्याने भारतात वस्तूंच्या विक्रीलाही अतिरिक्त मागणी येत आहे. ज्याचा फायदा महसूलात परावर्तित होत आहे.


आकडेवारीनुसार,ऑगस्टमध्ये सकल देशांतर्गत महसूल (Gross Domestic Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर ९.६% वाढून १.३७ लाख कोटी रुपये झाला आहे तर आयातीतून गोळा होणारा कर १.२% घसरून ४९३५४ कोटी रुपये झाला. सरकारने भरलेले परतावे (Return) इयर ऑन इयर बेसिसवर २०% घसरून १९३५९ कोटी रुपये झाले. निव्वळ जीएसटी महसूल १.६७ लाख कोटी रुपये झाला, जो १०.७% वाढ दर्शवितो. लहान राज्यांमध्ये, सिक्कीम (३९%), मेघालय (३५%) आणि नागालँड (३३%) यांनी जीएसटी महसुलात सर्वात जलद वाढ नोंदवली आहे. तसेच मोठ्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राने २८९०० कोटी रुपये (+१०%), कर्नाटकने १४२०४ कोटी रुपये (+१५%), तामिळनाडूने ११०५७ कोटी रुपये (+९%) आणि उत्तर प्रदेशने ९०८६ कोटी रुपये (+१०%) गोळा केले. दुसरीकडे, चंदीगड (-१२%), मणिपूर (-२४%) आणि झारखंड (-१%) यांनी संकलनात घट नोंदवली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी घोषणा केली होती की जीएसटीमधील "पुढील पिढीतील सुधारणा" या वर्षी दिवाळीपर्यंत जाहीर केल्या जातील. त्यांनी सांगितले की या सुधारणांमुळे सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळेल आणि लघु आणि मध्यम व्यवसायांना आधार मिळेल.२०१७ मध्ये सुरू झालेल्या जीएसटी प्रणालीला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि येणाऱ्या सुधारणा त्याच्या अंमलबजावणीनंतरच्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक असण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

सलग दहाव्या तिमाहीत घर विक्रीत घसरण या तिमाहीत ४% घसरणीसह सर्वाधिक घसरण महाराष्ट्रात

मुंबई:प्रॉपइक्विटीच्या नव्या अहवालानुसार, भारतातील आघाडीच्या नऊ शहरांमधील घरांच्या विक्रीत ४% घसरण झाली आहे.

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आला उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे हैदराबाद

जीएसटी कपातीमुळे १.५ लाख कोटींची बचत होणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'सिंहगर्जना' आणखी आपल्या अभिभाषणात काय म्हटले पंतप्रधान जाणून घ्या....

प्रतिनिधी:चालू वर्ष भारतीय इतिहासात जीएसटी कपात हा अविस्मरणीय क्षण ठरेल, ज्यामुळे सरासरी १.५ लाख कोटी

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी

ठाणे : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या 'गायमुख - कासारवडवली - वडाळा' या 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ'च्या गाड्यांची

आज अदानी पॉवर शेअर २०% उसळला तर इतर अदानी शेअर्समध्ये आजही जबरदस्त मायलेज 'या' तीन कारणांमुळे

मोहित सोमण:आज अदानी समुहांच्या शेअर्समध्ये मोठी सलग वाढ झाली. सर्वाधिक वाढ अदानी पॉवर (१९.३८%) शेअर्समध्ये झाली

आठवड्याची सुरुवात IT Stocks घसरणीने तज्ञांच्या मते..‌‌'

मोहित सोमण:जवळपास सगळ्याच आयटी शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. आज सत्र सुरूवातीलाच आयटी शेअर्समध्ये ६% पर्यंत घसरण