सोन्याची प्रति तोळा किंमत आयफोनहून अधिक सोन्याचा नवा विक्रमी उच्चांक १०५००० चा टप्पाही पार चांदीतही वाढ सोन्याचांदीत वाढ 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: सोन्याने आजही कहर केला आहे. आजही सोन्यात प्रचंड वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा ही वाढ असून या निमित्ताने गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे प्रति तोळ्याचीं किंमत आयफोनहून अधिक वाढली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थ ळावरील माहितीनुसार, २४ सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९३ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०५८८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९७०५ रू पये, १८ कॅरेटसाठी ७९४१ रूपयांवर पोहोचला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ सोन्याच्या प्रति तोळा दरात तब्बल ९३० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ७०० रूपयांनी वाढ झाली आ हे. ज्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०५८८० रूपये, २२ कॅरेटसाठी ९७०५० रूपये,१८ कॅरेटसाठी ७९४१० रूपयांवर पोहोचला आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०५८८ रूपये,२२ कॅरेटसाठी ९८०५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८०३० रूपयांवर पोहोचल्या आहेत. माहितीनुसार, जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.७८% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.६ ९% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३४७१.३२ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात ०.९८% वाढ झाली. त्यामुळे सोन्याची दरपातळी एमसीएक्समध्ये १०४८४३ .०० रूपयांवर गेली आहे.


आज दिवसभरात सोन्याचा निर्देशांकात प्रचंड मोठी वाढ झाली होती. सकाळच्या सत्रातच सोन्याच्या किमतींनी १०२०९० रुपयांचा मागील उच्चांक ओलांडला होता. आणि तो १००० रुपयांपेक्षा जास्त झाला होता. इंडिया बुलियन्स असोसिएशनच्या मते, सोन्याचा भा व १०३९१० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत होता. जागतिक संकेत आणि अनिश्चिततेमुळे किमती वाढल्या होत्या. शिवाय, कमोडिटीज मार्केटमधील अस्थिरतेमुळे कमोडिटी एक्सचेंज व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली.असे असताना डॉ लर निर्देशांकात होणारी सातत्याने वाढ, वाढलेल्या स्पॉट बेटिंगसह सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली सोन्याची मागणी, घसरलेला रूपया, आगामी व्याजदरात कपातीवरून युएस बाजारातील अस्थिरता, चीन व भारत यांच्यातील भेटीनंतर आगामी काळासाठी सोन्यातील केलेली गुंतवणूक 'होल्ड' अशा विविध कारणांमुळे सोन्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक घटकांमुळे सोन्याच्या किमतीत नवीन वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांना सर्वात मोठी आशा म्हणजे सप्टेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा असून यूएस फेडरल चेअर जेरोम पॉवेल यांनी त्यांच्या जॅक्सन होल भाषणात दर कपातीचे संकेत दिल्यानंतर, गेल्या काही दिवसांत काही इतर फेड अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की फेड या महिन्यात दर कपात करण्यास तयार आहे. तज्ञांच्या मते ही वाढ २५ बेसिस पूर्णांकाने (bps) होऊ शकते. फेड गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर म्हणाले की ते सप्टेंबरमध्ये व्याजदर कपात आणि पुढील तीन ते सहा महिन्यांत आणखी कपात करण्यास पाठिंबा देऊ शकतात.


अशा परिस्थितीत जागतिक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते की शुक्रवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये, सॅन फ्रान्सिस्को फेड बँकेच्या अध्यक्षा मेरी डेली यांनी कामगार बाजाराला असलेल्या धोक्यांमुळे व्याजदर कपातीसाठी आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त केला अशा ए कत्रित कारणांचा फटका आज सराफा बाजारात बसला होता. फेड पॉलिसी दरावर निर्णय घेण्यासाठी यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) १६-१७ सप्टेंबर रोजी बैठक घेणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


चांदीत किरकोळ वाढ कायम!


सोन्यासह चांदीच्या औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने तसेच दुर्मिळ धातूची कमतरता भासत असल्याने चांदीला आणखी महत्व प्राप्त झाले असल्याने आजही दरवाढ झाली. वाढलेल्या मागणीसह डॉलर निर्देशांकातील वाढीचा फटका आज भारतीय सराफा बाजा रातील चांदीच्या दरातही बसला. परिणामी ही वाढ झाली. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये, प्रति किलो दरात १००० रूपयांनी वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १२६ रूपये, प्रति किलो दर १२६००० रूप यांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १२६० रूपये, प्रति किलोसाठी १३६००० रूपयांवर पोहोचले आहेत.संध्याकाळपर्यंत जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात १.७४% वाढ झाली आहे. तसेच भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात तब्बल २.०३% वाढ झाल्याने दरपातळी प्रति किलो १२४३४५.०० रूपयांवर गेली आहे.

Comments
Add Comment

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

Netweb Technologies Stock Fall: Netweb Technologies कंपनीचा शेअर दिवसभरात ७% कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:नेटवेब टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर्समध्ये आज इंट्राडे ७% पातळीपर्यंत घसरण झाली आहे. काल कंपनीने

Lupin Share: Lupin Limited कंपनीचा शेअर जोरदार उसळला ! युएसमध्ये नवा प्रकल्प सुरू करणार 'या' किंमतीला तज्ज्ञांकडून Buy Call

मोहित सोमण:ल्युपिन लिमिटेड (Lupin Limited) या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी रॅली झाली आहे. विशेषतः लुपिन कंपनीकडून

Top Stock Picks to buy : आज मोतीलाल ओसवालकडून 'या' तीन शेअरला दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा सल्ला भविष्यात मोठा फायदा होणार !

Delhivery Common Market Price (CMP): ४६७ रूपये प्रति शेअर Target Price (TP) : ५४० रूपये प्रति शेअर (+१६%) खरेदी 'Buy Call' उत्सवाच्या

Upcoming Stock Bonus Issue: बोनस शेअर मिळवण्याची गुंतवणूकदारांना आयती संधी....आज १ व उद्या ४ कंपनीची Record Date निश्चित! जाणून घ्या यादी

प्रतिनिधी: आज नव्या कॉर्पोरेट अँक्शन प्रकाशधोतात असणार आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आज १ व

Stock Market Update: फार्मा,आयटी, हेल्थकेअर शेअर्समुळे शेअर बाजारात तेजी 'हे' देशांतर्गत कारण वाढीस कारणीभूत

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. पहाटे गिफ्ट निफ्टीतील किरकोळ