ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे. अमेरिकेने जगातील सर्वात मोठी विमानवाहक नौका अशी ओळख मिरविणाऱ्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहक नौकेला पश्चिम आशियात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच या भागात अमेरिकेची एक विमानवाहक नौका आहे. आता दुसरी विमानवाहक नौकाही पश्चिम आशियात येत आहे.


जेव्हा एक विमानवाहक नौका समुद्रात मार्गक्रमण करत असते त्यावेळी त्या नौकेच्या अवतीभोवती संबंधित देशाच्या लहान - मोठ्या युद्धनौका आणि पाणबुड्यांचा ताफा पण असतो. यामुळे अमेरिकेच्या दोन विमानवाहक नौका तैनात होणे याचा दुसरा अर्थ अमेरिकेच्या नौदलाचा मोठा ताफा पश्चिम आशियात येणे असा आहे. यामुळेच अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढल्याचे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आणि अनेक माजी सैन्य अधिकारी व्यक्त करत आहेत.


काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. अमेरिकेच्या कमांडो पथकाने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. यानंतर मादुरोंना तातडीने अमेरिकेत आणण्यात आले. अमेरिकेने व्हेनेझुएलातील सर्व तेल विहिरींच्या उत्खननाचे अधिकार स्वतःकडे घेतले. ही लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळ समुद्रात नौदलाचा ताफा तैनात केला होता. आता इराण विरोधात अमेरिका वेगाने लष्करी कारवाई करण्यासाठी हालचाली करत असल्याचे चित्र आहे.


ट्रम्प यांच्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहक नौकेबाबतच्या निर्णयावर तज्ज्ञ वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत. काही जणांनी इराणवर दबाव टाकण्यासाठी अमेरिका यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड ही विमानवाहक नौका पश्चिम आशियात पाठवत असल्याचे मत व्यक्त केले. तर काही तज्ज्ञांनी अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढल्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेची अब्राहम लिंकन अर्थात यूएसएस लिंकन ही विमानवाहक नौका काही दिवसांपूर्वीच पश्चिम आशियात पोहोचली आहे. आता यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड पोहोचल्यावर पश्चिम आशियातील अमेरिकेच्या विमानवाहक नौकांची संख्या दोनवर पोहोचणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

Comments
Add Comment

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या