मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी नकळत झालेल्या काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला अशा पाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे दरिद्रता वास करते आणि ती दूर करण्याचे सोपे उपायही सांगणार आहोत.
१. घरात तुटलेल्या आणि बंद घड्याळे
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळे असणे अशुभ मानले जाते. घड्याळ हे प्रगती आणि वेळेचे प्रतीक आहे. जर ते थांबले तर प्रगतीही थांबते, असे मानले जाते. त्यामुळे घरात बंद घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करा किंवा काढून टाका. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.
२. तुटलेली किंवा फुटलेली भांडी
स्वयंपाकघरात तुटलेली किंवा फुटलेली भांडी वापरणे अशुभ मानले जाते. अशी भांडी घरात नकारात्मकता आणतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण करू शकतात. त्यामुळे तुटलेली भांडी ताबडतोब घराबाहेर काढा.
३. तुटलेल्या वस्तू आणि भंगार
घरात तुटलेल्या वस्तू, जुने आणि निरुपयोगी भंगार जमा करणे योग्य नाही. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तुटलेल्या मूर्ती, फोटो, खराब झालेले फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नका. असे सामान घराबाहेर काढल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
४. तुटलेल्या काचेच्या वस्तू आणि आरसे
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेली किंवा तडा गेलेली काच किंवा आरसा ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि धनहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा आरसा किंवा काचेची कोणतीही वस्तू घरातून ताबडतोब काढून टाका.
५. छतावरून टपकणारे पाणी
जर तुमच्या घराच्या छतावरून किंवा नळांमधून सतत पाणी गळत असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार आर्थिक हानीचे लक्षण मानले जाते. गळणारे पाणी हे पैशाच्या अपव्ययाचे प्रतीक आहे. असे गळणारे पाणी लगेच दुरुस्त करून घ्या, यामुळे घरात पैशाची बचत होईल आणि समृद्धी टिकून राहील.