प्रवासी गाड्यांच्या विक्रीत महाराष्ट्रच नंबर वन

प्रतिनिधी:प्रवासी गाड्यातील विक्रीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रवासी गाड्यांची (Passenger Vehicles PV) विक्री १० लाखांवर पोहोचली आहे. एसआयएएम (Society of Indian Automobile Manufactures SIAM) अहवालातील माहितीनुसार, एप्रिल ते जून तिमाहीत १०.१२ लाख प्रवासी गाड्या विकल्या गेल्या आहेत. पश्चिम विभागीय क्षेत्रात (Western Zone) मध्ये सर्वाधिक ३.२१ लाख गाड्यांची विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली असून ही विक्री तब्बल १.१ ९ लाख युनिट्स गाड्यांची होती.


अहवालातील माहितीनुसार, महाराष्ट्राने प्रवासी विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा यांचा क्रमांक लागतो. दुचाकी गाड्यांच्या श्रेणीत देशभरात ४६.७५ लाख युनिट्सची विक्री नोंदवली आहे. सर्वाधिक विक्री प श्चिम भारतातील राज्यात नोंदवली गेली आहे जी एकूण १४.१९ लाख युनिट्सची विक्री नोंदवली. दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेशाचा ८.१८ लाखांची विक्री नोंदवली गेली आहे. व्यवसायिक वाहनात महाराष्ट्रात ३२००० युनिट्सची विक्री नोंदवली गेली आहे.


माहितीनुसार देशभरात या काळात २.२३ लाख युनिट्स गाड्यांची विक्री नोंदवली गेली आहे. तिचाकीचा विक्रीत वाढ झाली असून ती या कालावधीत १.६५ लाख युनिट्स विक्रीसह वाढ नोंदवली गेली आहे. जुलै २०२५ मध्ये कंपन्यांकडून डीलर्सना एकूण प्रवासी वा हनांची पाठवणी जुलै २०२४ मध्ये ३४१५१० युनिट्सवरून किंचित कमी होऊन ३४०७७२ युनिट्सची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.