WhatsApp वरच प्रोफेशनल फोटो एडिटिंग; स्टेटस एडिटरमध्ये मेटा AI टूल्सची चाचणी सुरू

कॅलिफोर्निया : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता कोणतेही वेगळे अ‍ॅप न वापरता WhatsApp वरच प्रोफेशनल पद्धतीने फोटो एडिट करता येणार आहे. WhatsApp iOS आणि अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये स्टेटस एडिटरमध्ये मेटा AI आधारित फोटो एडिटिंग टूल्सची चाचणी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.


या नव्या फीचरमुळे स्टेटस तयार करताना युजर्स थेट WhatsApp मधूनच फोटो एडिट करू शकणार आहेत. सुरुवातीला अँड्रॉइड बीटामध्ये हे फीचर दिसून आले असून आता iOS बीटा (TestFlight) युजर्सनाही ते उपलब्ध होऊ लागले आहे. काही आयफोन युजर्सना स्टेटस तयार करताना नवीन एडिटिंग इंटरफेस दिसत असून त्यामध्ये पारंपरिक फिल्टर्ससोबत AI टूल्सचाही समावेश आहे.


https://faq.whatsapp.com/3894481717447270/?cms_platform=android&helpref=platform_switcher

मेटा AI च्या मदतीने WhatsApp अ‍ॅनिमे, कॉमिक बुक, क्ले, पेंटिंग, 3D, कवाई, व्हिडिओ गेम अशा अनेक AI स्टाइल्सची चाचणी घेत आहे. या स्टाइल्स केवळ फिल्टर नसून AI फोटो पूर्णपणे नवीन स्वरूपात तयार करते. परिणाम पसंत न पडल्यास त्याच स्टाइलमध्ये पुन्हा फोटो जनरेट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.


याशिवाय मेटा AI फोटोंमधून अनावश्यक वस्तू काढून टाकणे, नवीन घटक जोडणे, पार्श्वभूमी बदलणे तसेच स्थिर फोटोंना लहान अ‍ॅनिमेटेड क्लिपमध्ये रूपांतरित करण्याची सुविधाही देणार आहे. विशेष म्हणजे फोटो एडिट करताना पार्श्वभूमी नैसर्गिक ठेवली जाते, त्यामुळे फोटो अधिक व्यावसायिक दिसतो.


सध्या हे फीचर निवडक बीटा युजर्ससाठीच उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने विविध देश आणि युजर ग्रुपमध्ये रोलआउट केले जाणार आहे. एकूणच, या अपडेटमुळे WhatsApp स्टेटस लवकरच युजर्ससाठी मिनी क्रिएटिव्ह स्टुडिओ बनेल यात शंका नाही.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.