नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्तांनी यासंदर्भात शुक्रवारी स्वतंत्र अधिसूचना जाहीर करून तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे ठाणे आणि पनवेलच्या अनेक ठिकाणाहून मुंबईत प्रवेश करणा-या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांना रोखण्यात येत आहे. पनवेल शीव महामार्गावर खारघर टोलनाक्याच्या उड्डाणपुलाखाली कळंबोली पोलिसांनी बंदोबस्त लावून ही वाहने थांबविण्यात आली आहे. तसेच रबाळे, ऐेरोली, वाशी, मुंबईच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना बंदीचे आदेश दाखवून थांबवून रस्त्याकडेला उभे केले जात आहे. माल घेऊन मुंबईत जाणा-या अवजड वाहनचालकांना आंदोलनामुळे ऐेनपावसाळ्यात जावे कुठे असा प्रश्न पडला आहे. आंदोलनामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभे केल्यास नवी मुंबईतील मुख्य महामार्गांवर सुद्धा वाहतूक कोंडी होऊ शकते अशी भिती असल्याने जोपर्यंत मुंबईची वाहतूक कोंडी फुटत नाही तोपर्यंत नवीन आदेश येईपर्यंत तातडीने वाहतूकादांशी वाहनचालकांशी संपर्क करून सूरक्षित ठिकाणी त्यांचे वाहन उभे कऱण्याची विनंती पोलिसांकडून अवजड वाहनचालकांना केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरूपती काकडे यांनी काढलेल्या आदेशात काय म्हटले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतूक करणा-या वाहनांना वाशी टोलनाका, अटलसेतू आणि एेरोली मार्गे मुंबईत प्रवेश कऱण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पुर्णता बंदी राहणार आहे.
जेएनपीए ते गव्हाण फाटा कंटेनर वाहतूक कोंडी
जेएनपीए बंदरातून जाणारे हजारो कंटेनर वाहने अडकून पडली आहेत. जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर धुतुम,चिर्ले ते गव्हाण फाटा असा तब्बल दहा किलोमीटर लांबीच्या कंटेनर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत उरण वरून जाणारी अनेक प्रवासी वाहनेही अडकली होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचाही खोळंबा झाला होता. ही कोंडी दूर करण्यासाठी उरणच्या वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणारी कंटेनर वाहनांच्या तीन तीन रांगा लागल्या होत्या. यातील एक रांग सुरू करण्यात उरणच्या वाहतूक पोलिसांनी यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली आहे.