Bigg Boss 19 Update : प्रणित मोरेवर सलमानचा घणाघाती प्रहार! प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा, म्हणाला... मर्यादा ओलांडलीस

मुंबई : ‘बिग बॉस १९’चा पहिला आठवडा प्रेक्षकांसाठी जबरदस्त मसालेदार ठरला आहे. घरात रोज कुठेतरी वाद, भांडणं आणि गोंधळ होत असून प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे फरहाना भट. फरहाना काही दिवस ‘सिक्रेट रूम’मध्ये होती. पण आता ती पुन्हा घरात परतली असून तिच्या पुनरागमनाने बिग बॉसचं घर अक्षरशः हललं आहे. घरात पाऊल टाकताच फरहानाने सदस्यांचे अनेक गुपित उघड केले आहेत. यामुळे काही सदस्य धास्तावले तर काहींमध्ये नवी चर्चा रंगली आहे. फरहानाने केवळ गुपितांचं बॉम्बस्फोटच केला नाही तर घरातील दोन महत्त्वाच्या स्पर्धकांना गौरव खन्ना आणि झीशान कादरी यांना भिडवून झालेला वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या समेटामुळे घरातील वातावरण थोडं शांत झालं असलं तरी फरहानाच्या परतण्याने पुढील दिवसांत घरात नवा तुफान डोकेदुखी होणार, हे नक्की दिसून येत आहे. सोशल मीडियावरदेखील फरहाना भट प्रचंड चर्चेत असून ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ती सतत ट्रेंड होत आहे. तिच्या परतीनंतर बिग बॉस १९ मध्ये अजून रंगत वाढणार यात शंका नाही.


‘बिग बॉस १९’च्या घरात स्पर्धक प्रणित मोरे सध्या चर्चेत आला आहे. प्रणित हा व्यावसायिक कॉमेडीयन असून त्याने बिग बॉस मध्ये येण्याआधी अनेक लोकप्रिय कॉमेडी शोजमध्ये काम केले आहे. या शोजमध्ये त्याने अनेकदा बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान यांच्यावर विनोदी पद्धतीने टीका केली होती. त्यांच्या करिअरवरून तेव्हा चिमटे काढले गेले, अगदी त्यांच्यावर झालेल्या वादग्रस्त प्रकरणांचीही खिल्ली उडवली गेली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर एक नवा प्रोमो कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केला असून तो क्षणात व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान बिग बॉसच्या घरातील स्पर्धक प्रणित मोर याच्यावर थेट संताप व्यक्त करताना दिसत आहेत. प्रणितच्या पूर्वीच्या विनोदांनी आणि टोमण्यांनी दबंग खान नाराज असल्याचं या प्रोमोमधून स्पष्ट होतं. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी प्रणितच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी सलमानच्या संतापाचं समर्थन व्यक्त केलं. आगामी भागात या वादाची पुढील कहाणी कशी उलगडते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.



सलमान खानचा प्रणित मोरला सवाल – “मर्यादा ओलांडलीस का?”




शोच्या ताज्या प्रोमोमध्ये होस्ट सलमान खानने कॉमेडीयन प्रणित मोरेला थेट स्टेजवरून सवाल करताना पाहायला मिळालं. प्रणित मोरे हा स्टॅंड-अप कॉमेडीयन असून त्याने अनेकदा आपल्या शोमध्ये सलमान खानवर विनोद केले होते. सलमानने प्रणितकडे पाहून स्पष्ट शब्दांत सांगितलं, “तू स्टॅंड-अप कॉमेडीयन आहेस, मला माहित आहे की तू माझ्याबद्दल बाहेर काय काय बोललास. पण ते योग्य नाही. माझ्यावर केलेले जोक्स जर मी तुझ्या जागी असतो आणि तू माझ्या जागी असतास, तर तुझी प्रतिक्रिया काय असती? लोकांना हसवायचं होतं म्हणून माझं नाव वापरलं, पण मला वाटतं की तू एक मर्यादा ओलांडलीस.” सलमानचा हा सवाल ऐकून घरातील इतर सदस्यांसह प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे. प्रणित यावर काय उत्तर देतो आणि या वादाचा पुढे शोच्या वातावरणावर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



फरहाना भट पुन्हा घरात


प्रणित मोरला फटकारल्यानंतर आता सलमान काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, स्पर्धक फरहाना भटही पुन्हा चर्चेत आली आहे. शोच्या पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं. मात्र, बिग बॉसने तिला थेट बाहेर न काढता गुप्त खोलीत ठेवले होते. तिथून फरहानाने घरातील सदस्यांचे संवाद ऐकले आणि बिग बॉससमोर स्वतःची मतं मांडली. आता, ताज्या भागात फरहाना पुन्हा एकदा घरात प्रवेश करत आहे. तिच्या पुनरागमनामुळे घरातील नाती, गटबाजी आणि वाद अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.



बसीर-प्रणितवर रोष, कुनिकेचं गुपित उघड


‘बिग बॉस १९’च्या घरात परतताना फरहाना भटने सुरुवातीपासूनच धडाकेबाज एंट्री केली आहे. गुप्त खोलीतून बाहेर पडून घरात येताच तिने घरातील सदस्यांची गुपितं उघड करत वादाला सुरुवात केली. फरहानाने सर्वात आधी बसीर अलीवर निशाणा साधला. त्याच्यावर रोष व्यक्त करत तिने घरात वातावरण चांगलंच तापवलं. यानंतर तिने प्रणित मोरेच्या कॉमेडीवर टिप्पणी करत त्याचे विनोद खूपच वाईट असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. फरहाना इथेच थांबली नाही. तिने गौरव खन्नाला कुनिका सदानंदबद्दल धक्कादायक माहिती दिली. “कुनिका तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल लोकांना भडकवते,” असं तिने गौरवसमोर उघड केलं. फरहानाच्या या वक्तव्यामुळे घरातल्या नात्यांमध्ये नवी कलहाची बीजं पेरली गेली आहेत.

Comments
Add Comment

बिग बॉस १९' मध्ये मराठी वाघाला जोरदार पाठिंबा!

प्रणित मोरे आणि बसीर-आमल यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रातून 'कॉमेडियन'ला मोठा सपोर्ट मुंबई: टेलिव्हिजनवरील

‘वेल डन आई’चा धम्माल टीझर प्रदर्शित

आजच्या मॉडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा 'वेल डन आई' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!

सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटातील ‘ओल्या

भाईजानने एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला दिल्या शुभेच्छा?

अभिनेत्री कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आई-बाबा

दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’

‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यांचे

गौरव मोरेची फिल्टरपाड्याच्या चाळीतून थेट टॉवरमध्ये एन्ट्री !

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा