टाटा मोटर्सकडून नवीन विंगर प्‍लस लॉच

विंगर प्‍लस कर्मचारी वाहतूक आणि प्रवास व पर्यटनासाठी अनुकूल आहे


मुंबई: भारतातील मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने नवीन ९-आसनी टाटा विंगर प्‍लस लॉंच केली. ही प्रीमियम प्रवासी गतीशीलता ऑफरिंग कर्मचारी वाहतूक आणि विकसित होत असलेल्‍या प्रवास व पर्यटन विभागा साठी डिझाइन करण्‍यात आली आहे. कंपनीने या लाँच विषयी म्हटले आहे की,'विंगर प्‍लस प्रवाशांना अधिक आरामदायीपणा, एैसपैस जागा आणि कनेक्‍टेड प्रवास अनुभव देते, तसेच ताफा मालकांना मालकीहक्‍काच्‍या कमी एकूण खर्चासह उच्‍च कार्यक्षमता व नफा संपादित करण्‍यास सक्षम करते. या वेईकलची किंमत २०.६० लाख रूपये (एक्‍स-शोरूम, नवी दिल्‍ली) आहे. या वेईकलमध्‍ये डिझाइन, वैशिष्‍ट्ये व तंत्रज्ञानाचे उत्तम संयोजन आहे, जे विभागामध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतात.'विंगर प्‍लसमध्‍ये विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये आहेत जसे रिक्‍लायनिंग कॅप्‍टन सीट्ससह समायोजित (अँडजस्‍टेबल) आर्मरेस्‍ट्स, वैयक्तिक यूएसबी चार्जिंग पॉइण्‍ट्स, वैयक्तिक एसी व्‍हेण्‍ट्स आणि एैसपैस लेगरूम. एैसपैस जागा असलेली केबिन आणि मोठे सामान कक्ष लांबच्‍या प्रवासाद रम्‍यान अधिक आरामदायीपणा देतात. मोनोकॉक चेसिसवर डिझाइन करण्‍यात आलेली ही वेईकल प्रबळ सुरक्षितता व स्थिरता देते. तसेच, या वेईकलमधील कारसारखी राइड व हाताळणी सहजपणे ड्रायव्हिंगची खात्री देतात आणि ड्रायव्‍हर्सना ड्रायव्हिंग करता ना थकवा येत नाही असे कंपनीने उत्पादनाविषयी अधिक माहिती देताना स्पष्ट केले आहे.


लाँच विषयी बोलताना,नवीन विंगर प्‍लस लॉंच करत टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख आनंद एस. म्हणाले आहेत की,'विंगर प्‍लस प्रवाशांना प्रीमियम अनुभव आणि ताफा ऑपरेटर्सना लक्षवेधक मूल्‍य तत्त्व देण्‍या साठी विचार पूर्वक डिझाइन करण्‍यात आली आहे. उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा, दर्जात्‍मक आरामदायी वैशिष्‍ट्ये आणि विभागातील अग्रणी कार्यक्षमता असलेली ही वेईकल नफा वाढवण्‍यासह मालकीहक्‍काचा कमी खर्च देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. भारताती ल प्रवासी गतीशील क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, जेथे शहरी भागांमध्‍ये कर्मचारी वाहतूकीपासून देशभरातील पर्यटनासाठी मागणी वाढत आहे. विंगर प्‍लस या विविध मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी व्‍याव सायिक प्रवासी वाहन विभागामध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करते.'


नवीन विंगर प्‍लसमध्‍ये प्रमाणित व इंधन-कार्यक्षम २.२ लिटर डिकॉर डिझेल इंजिनची शक्‍ती आहे, जे १०० एचपी शक्‍ती आणि २०० एनएम टॉर्क देते.ही प्रीमियम व्‍हॅन टाटा मोटर्सच्‍या फ्लीट एज कनेक्‍टेड वेईकल पलॅटफॉर्मसह देखील सुसज्‍ज आहे,जे सुधारित व्य वसाय व्‍यवस्‍थापनासाठी रिअल-टाइम वेईकल ट्रॅकिंग, डायग्‍नोस्टिक्‍स आणि फ्लीट ऑप्टिमायझेशन देते.विविध पॉवरट्रेन्‍समधील विविध कन्फिग्‍युरेशन्‍सतील ९-आसनी ते ५५-आसनी वेईकल्‍समध्‍ये वैविध्‍यपूर्ण व्‍यावसायिक प्रवासी वाहन पोर्टफोलिओ असण्‍यासह टाटा मोटर्स प्रत्‍येक मास-मोबिलिटी विभागाच्‍या गरजांची पूर्तता करते. या श्रेणीला पूरक टाटा मोटर्सचा सर्वांगीण वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापन उपक्रम 'संपूर्ण सेवा २.०' आहे, जो हमीपूर्ण टर्नअराऊंड वेळ, वार्षिक देखभाल करार (एएमसी), अस्सल स्‍पेअर पा र्ट्सची उपलब्‍धता आणि विश्सनयी ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍सची खात्री देतो. यावेळी सेल व सर्विसेस बद्दल बोलताना कंपनीने दावा केला आहे की,संपूर्ण भारतात ४५०० हून अधिक सेल्‍स व सर्विस टचपॉइण्‍ट्सच्‍या प्रबळ नेअवर्कसह कंपनी विश्वासार्ह, कार्यक्षम आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देत आहे.

Comments
Add Comment

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या