गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू
पालघर : गणेशोत्सव २०२५ मध्ये देशभक्तीची भावना जागवणारा एक अनोखा देखावा पालघर जिल्ह्यात विशेष आकर्षण ठरत आहे. वाडा तालुक्यातील घोणसई गावातील युवक हर्षल पाटील यांनी घरच्या बाप्पासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित देखावा साकारला आहे.
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया! अशा जयघोषांनी प्रत्येक घराघरात आणि रस्त्यावर वातावरण दुमदुमून जातं. भक्तांच्या हृदयात अपार श्रद्धेचा ...
या देखाव्याची प्रेरणा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून घेण्यात आली आहे. त्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत दाखवलेले शौर्य, बलिदान आणि देशभक्ती याचे चित्रण या सजावटीत अचूकपणे उभे केले आहे. भारतीय जवानांच्या पराक्रमाला आणि सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला असून, गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गणपतीच्या धार्मिकतेसोबत देशप्रेमाचा संदेश देणारा हा देखावा गणेशभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.