Friday, August 29, 2025

Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

Maratha Andolan : मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

तसेच या आंदोलनाला आणखी एक वाढीव दिवस मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान प्रशासनानेही अतिशय सावधगिरीची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे आदेश सुट्टीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आले आहेत.

सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा तसेच गैरहजर असलेल्या पोलिसांनी तातडीने कामावर येण्याच्या सूचना या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे याचे नियोजन करताना पोलीसबळ अपुरे पडत असल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >