मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट; सीएसएमटी परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मराठा आंदोलकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर भगव्या झेंड्यांनी गजबजून गेला आहे. सकाळपासून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आंदोलनाचा जोर वाढत चालला आहे. मात्र या आंदोलनादरम्यान सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठा गोंधळ उडाला. एका मराठा तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या तरुणाला थांबवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदान चिखलमय झाले आहे. पाणी साचल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. पावसापासून बचावासाठी आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेत होते. आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर मराठा आंदोलकांनी सीएसएमटी, चर्चगेट परिसर गाठला असून तिथेही मोठी गर्दी झाली होती. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदान चिखलमय झाले होता. पाणी साचल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर मराठा आंदोलकांनी सीएसएमटी, चर्चगेट परिसर गाठला असून तिथेही मोठी गर्दी झाली होती.


सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांनी हलगीच्या तालावर जल्लोष केला. 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाबाजीत परिसर दुमदुमला. आंदोलकांनी सेल्फी आणि व्हिडिओ काढत एकजुटीचा संदेश दिले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती