jyeshtha gauri pujan 2025 date: यंदा यावर्षी आहे 'ज्येष्ठा गौरी' आवाहन, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

  42

बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झालं आहे. त्यानंतर आता चार दिवसांनी म्हणजेच ३१ ऑगस्टला ज्येष्ठा गौरीचं (Jyeshtha Gauri Avahana) आगमन होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक घरात ज्येष्ठा गौरी व्रत केले जाते, देवी गौरी ही माता पार्वतीचेच एक रूप आहे. या व्रताला खूप मोठे महत्व आहे. खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात या सणाला महालक्ष्मी व्रत असे संबोधले जाते. चला तर मग जाणून घेऊयात ज्येष्ठा गौरी आवाहन तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व.

गणेशोत्सवादरम्यान येणारे ज्येष्ठा गौरी व्रत अर्थात गौराई हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठा गौरी व्रत अर्थात गौराई व्रतात देवी गौरीची पूजा केली जाते. ज्येष्ठा गौरी व्रत हा तीन दिवसीय उत्सव असतो. त्यानुसार यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी गौरी आवाहन होईल, त्यांनंतर १ सप्टेंबरला गौरी पूजन आणि २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाणार आहे. जाणून घेऊयात त्याचे मुहूर्त आणि विधी-

ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त


रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत गौरी आवाहन करता येईल. हा दिवस अनुराधा नक्षत्रात साजरा केला जातो. या दिवशी देवीच्या आगमनासाठी प्रतिमा किंवा प्रतीके स्थापित केली जातात.

गौरी पूजन:


सोमवार, १ सप्टेंबर २०२५ रोजी देवी गौरीची पूजा केली जाईल. शुभ मुहूर्त: सकाळी ५ वाजून ५९ मिनिटं ते सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. हा दिवस ज्येष्ठा नक्षत्रात येतो. या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून महानैवेद्य अर्पण केला जातो.

गौरी विसर्जन:


मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे. हा दिवस मूळ नक्षत्रात येतो.

अशाप्रकारे, तीन दिवसांचा हा ज्येष्ठा गौरी व्रत  ३१ ऑगस्टपासून २ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.

कशी करावी ज्येष्ठ गौरी आवाहन पूजा?


जी महिला गौरी घरात घेऊन येते तिचे पाय दूध आणि पाण्याने धुतले जातात, त्यानंतर तिच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. घरात प्रवेश करताना दरवाज्यापासून पूजा होणाऱ्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. काही ठिकाणी तेरड्याच्या रोपांना मुखवटा लावून गौरीची प्रतिमा सजवली जाते. तर, काही भागात लाकडी किंवा मातीच्या मूर्तींना साडी व दागिने नेसवून नटवले जाते. गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात ओवसा पद्धत केली जाते. सुवासिनी गौरीला वाण देतात. रात्री गौरीचे जागरण केले जाते. यावेळी झिम्मा-फुगडीच्या खेळाने वेगळीच रंगत येते.

पहिल्या दिवशी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी (ज्येष्ठा गौरी पूजन) पुरणपोळी, आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांचा समावेश असलेला थाटाचा जेवणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनावेळी हळदीकुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी पाडल्या जातात. या दिवशी गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा पापड यांचा नैवेद्य केला जातो.

गौरी ही समृद्धी, सौंदर्य आणि मंगलमयतेचे प्रतीक मानली जाते. भक्त मनोभावे पूजन करून देवीला साडी, दागिने, हळद-कुंकू, सुपारी आणि सुका मेवा अर्पण करतात. उत्तरपूजेत देवीला निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जाते. गौरींचे विसर्जन झाल्यावर पाण्यातून वाळू घरी आणून घरभर शिंपडण्याची प्रथा आहे. या वाळूमुळे घरात समृद्धी येते आणि कीटकांपासून बचाव होतो अशी श्रद्धा आहे.

 

 
Comments
Add Comment

मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट; सीएसएमटी परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मुंबईत आज सकाळपासून मराठा आंदोलकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज

विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार !

मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार इमारत दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट पालघर:  विरारमध्ये

पेटीएमकडून गुगल पे संबंधित मोठे स्पष्टीकरण: हे अपडेट केवळ ....

प्रतिनिधी:वित्तीय सेवा फिनटेक कंपनी पेटीएमने (Paytm) एक नवे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की,' युनिफाइड

Maratha Andolan: मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली, अटी व शर्ती लागू

मुंबई: मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात

औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलै महिन्यातही वाढला !

नवी दिल्ली:उत्पादन क्षेत्राच्या (Manufacturing Sector) चांगल्या कामगिरीमुळे या वर्षी जुलैमध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन

Gold Silver Rate: आज सणासुदीला सोन्यात तुफान वाढ चांदीत मात्र घसरण ! जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोने उसळले आहे. सोन्याच्या दरात ही मोठी वाढ जागतिक भूराजकीय परिस्थितीमुळे झाली आहे.