मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. रविंद्र शंकर चिटणीस, अभिषेक रविंद्र चिटणीस यांनी घरच्या बाप्पासाठी 'माझ्या मराठीची गोडी' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.
या संकल्पनेतून त्यांनी एक छोटा संदेशसुद्धा पोहोचवला आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली असली तरी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी झालेला लढा आणि त्यातील बलिदान आजही ताजे आहेत. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मात्र आजही महाराष्ट्राचे काही प्रांत कर्नाटक आणि गुजरातकडे आहेत, हे वास्तव मराठी जनतेच्या मनाला सतत वेदना देत आहे. याचबरोबर महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परप्रांतीयांचा ओघ वाढल्याने स्वतःच्या मातृभाषेची ओळख जपण्यासाठी मराठी माणसालाच संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त केली जाते.
गणेशोत्सव १० दिवस साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत. यापैकी काही प्रमुख कारणे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांशी जोडलेली आहेत. धार्मिक कारण: ...
“महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं आणि मराठी टिकवायचं, अन्यथा महाराष्ट्र सोडायचं,” अशी ठाम भूमिका स्वाभिमानी मराठी तरुण मांडताना दिसत आहेत. मराठीच्या गतवैभवासाठी हा लढा अखेरपर्यंत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा लढा आणि मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण याचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.