वर्षा शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्यदूतांकडून ‘श्रीं’चे दर्शन


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्यदूतांनी ‘श्रीं’चे दर्शन घेत मनोभावे आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व महावाणिज्यदूतांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ३५ महावाणिज्यदूतांनी सहकुटुंब श्री गणरायाच्या आरतीत सहभाग घेतला.


फ्रान्सचे जीन मारे सेरे चार्लेट, ब्रिटीश उच्चायुक्तालयाचे राजकीय प्रमुख जॉन निकेल, मलेशियाचे अहमद झुवारी युसूफ, साउथ कोरियाचे डाँगवान यू, ब्राझिलचे जाओ दे मेंडोन्का लिमा नेतो, बांग्लादेशच्या श्रीमती फरहाना अहमद चौधरी, इंडोनेशियाचे इडी वॉरडोयो, यूएईचे अब्दुल्ला हुसेन अल्मारझुकी, अर्जेंटिनाचे डॅनिअल क्यूर कन्फलोनिरी, श्रीलंकेचे प्रियंगा विक्रमसिंघे, इजिप्तचे दहिला तवाकोल, फिनलंडच्या इवा निल्सन, पोलंडचे थोमाझ, कतारचे अहमद साद अल सुलैती, मॉरिशसचे दुशांत बक्तोवार, इसराईलचे कोब्बी शोशनी, जपानचे कोजी यागी, युएसएचे मायकेल स्क्रेन्डर, टर्कीचे मुस्तफा केमालटीन युगूर, पनामाचे रॉर्बटो रॉड्रिग्ज प्रडा, इराकचे झुहायर साद अब्बास, कुवेतचे शाये अबू शायबा, ऑस्ट्रेलियाचे पौल मुर्फी, आर्यलँडचे टॉम नूनन, नेदरलँडचे नाबील तौती, बेलारूसचे अलिकसंदर मत्सूको, स्पेनचे जॉर्ज डी लुकास कॅडेनास, थायलंडच्या थितीपॉर्न चुचीन्नावट, स्वीडनचे उपमहावाणिज्यदूत जोकीम गुन्नारसन, स्विर्झलँडचे मॅथिअस कोएग्ल, सौदी अरेबियाचे सुलेमान ईद अलोतैबी, इटलीचे वॉल्टर फेरारा, मेक्सिकोच्या अड्रिना विल्लानेवा, चीनचे क्वीन जी, जर्मनीचे क्रिस्टोफ रेंडटॉर्फ, सिंगापूर


Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

सतत थकवा जाणवतोय ? हे सोपे उपाय देतील तुम्हाला नवीन ऊर्जा !

मुंबई : आपली जीवनशैली जसजशी गतिमान होत आहे, तसतसे शरीर आणि मनावर ताण वाढत चालला आहे. दिवसभराची धावपळ, चुकीच्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून