डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तरुण मृतदेह प्रकरणी तिघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सनी कुमार चौधरी, गिरधारी रॉय आणि मृत्युंजय झा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केशव चौधरी, असे मृत तरुणाचे नाव आहे. केशव मूळचा बिहारचा, दोन आठवड्यांपूर्वी नोकरीसाठी तो त्याचा मामा मृत्युंजय झा याच्यासोबत राहत होता. माझगावमधील एका इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. केशवच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय हे देखील याच परिसरात राहायला होते. सोमवारी रात्री, केशव त्याचा मामा, सनी आणि गिरधारी यांच्यासोबत दारू पित असताना गावातील जमिनीवरून त्यांच्यात वाद झाला. मद्यधुंद अवस्थेतील मृत्युंजय आणि त्याच्या दोन मित्रांनी केशववर हल्ला केला. मृत्युंजयने केशवच्या मानेवर पाय ठेवून त्याचा गळा दाबला, केशवचा जागीच मृत्यू झाला. तिघांनी मिळून केशवचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टँकमध्ये टाकला. सनी आणि गिरधारी भुसावळला पळून गेले. मृत्युंजय मुंबईतच होता पोलीसी चौकशीत पोलिसांना मृत्युंजयवर संशय आला. चौकशीत मृत्युंजयने गुन्हा कबुल केला. गुन्हे शाखा युनिट ३ ने इतर दोन आरोपींना भुसावळ येथून मुंबईला आणले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश