पाकिस्तानविरुद्ध खेळणे इतर संघांविरुद्ध खेळण्यापेक्षा वेगळे आहे का? किंवा तो एक सामान्य सामना मानला जातो का? असे विचारले असता शमीने, ‘तो अनुभव खरोखरच वेगळा आहे’ असे सांगितले. शमीला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, 'काही लोक मला मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य करतात, विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर. पण मला त्याची पर्वा नाही, कारण मी काही यंत्र (मशीन) नाही. चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील. जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळतो, तेव्हा माझे लक्ष्य विकेट घेण्यावर आणि विजय मिळवण्यावर असते, सोशल मीडियावर नाही. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो.’
सरकार आणि मंडळाच्या निर्णयांचे पालन
आशिया कप २०२५ मध्ये भारताला १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी एका वृत्तवाहिनीवर शमीला विचारण्यात आले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे का? तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले आणि सांगितले की, ‘मी वादांपासून दूर राहतो. सामन्यांबद्दलचे निर्णय सरकार आणि बीसीसीआय घेतात. आम्ही त्याचे पालन करतो.’