गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार


गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवादी आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक .३०३ रायफल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमक अद्याप सुरू आहे.





गडचिरोलीनारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक दहा आणि इतर माओवादी नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा पथकास दिली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी - ६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ जलद कृती दलाची (CRPF QAT) दोन पथके जंगल परिसरात रवाना झाली. मुसळधार पावसामुळे सुरक्षा पथकाला नक्षलवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले. पण सर्व अडचणींवर मात करत सुरक्षा पथकाने जंगलात शोध मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाचे जवान बघून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. जंगलात लपलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’