म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करायला मुदतवाढ


मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.


सदर सोडतीसाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत १ लाख ४९ हजार ९४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह १ लाख १६ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठी १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. १३ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतात. १५ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.


सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३ हजार २ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १ हजार ६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


सोडतीसंदर्भात अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे ०२२ - ६९४६८१०० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.



Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि