पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा मोठा फटका गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला बसला असून, शाळेचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे सुमारे ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी तिथे अडकले आहेत.


ही शाळा गुरुदासपूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. तळमजल्यावरील वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याने भरल्या असून, रस्ते खराब झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्याचे अधिकारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बचावकार्य सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, पुराची शक्यता तीन दिवसांपासून माहीत असतानाही मुलांना सुरक्षित का हलवले नाही, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी दिली असताना, या निवासी शाळेतील मुलांना घरी का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


१९८८ च्या महापुरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सध्याची परिस्थिती त्यावेळेपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा केला जात आहे. शाळेजवळचा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे पाणी थेट वस्तीमध्ये शिरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

Comments
Add Comment

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत