पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा मोठा फटका गुरुदासपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाला बसला असून, शाळेचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे सुमारे ४०० विद्यार्थी आणि ४० कर्मचारी तिथे अडकले आहेत.


ही शाळा गुरुदासपूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. तळमजल्यावरील वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याने भरल्या असून, रस्ते खराब झाल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्याचे अधिकारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने बचावकार्य सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले नव्हते. मात्र, पुराची शक्यता तीन दिवसांपासून माहीत असतानाही मुलांना सुरक्षित का हलवले नाही, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी दिली असताना, या निवासी शाळेतील मुलांना घरी का पाठवले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


१९८८ च्या महापुरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सध्याची परिस्थिती त्यावेळेपेक्षा अधिक गंभीर असल्याचा दावा केला जात आहे. शाळेजवळचा नाला गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे पाणी थेट वस्तीमध्ये शिरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा