"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया अमरावतीमधील भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून मुबंईच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच, जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची योजना आखली आहे, ज्याचा परिणाम गणेशोत्सवावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या काळांत मुंबईत लाखोंच्या संख्येने भाविक गणपती पाहायला येतात, अशावेळी जरांगे पाटलांचि फौज मुंबईत धडकणार असल्याने प्रशासनाचे देखील काम वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर,  जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवानंतर आंदोलनाला सुरुवात करावी, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

नवनीत राणा यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटील भूमिकेवर प्रतिक्रिया देताना आपले मत मांडताना म्हंटले की, "न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. गणेशोत्सव हिंदूंचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात खूप उत्साहाचं वातावरण असून, तो महाराष्ट्रात अतिशय भक्तीभावानं सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असतो. त्यामुळे हे ११ दिवस सोडून, परत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर येऊ शकता."
Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा