वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज सकाळी  मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. त्यावेळी सकाळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एक वर्षाची चिमूरडी आणि तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली होती, तर ११ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. या सर्वांना विरार आणि नालासोपारा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरीसुद्धा अजून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याकारणामुळे बचावकार्य संध्याकाळपर्यंत सुरूच राहिले. त्यानंतर अखेरीस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. त्याद्वारे एकूण ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.


या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार,  आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून  बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे, तर बाकीची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. या दुर्घटनेत एकूण ९ जण जखमी झाले आहेत.



मृतांची नावे


दुर्घटनेत लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष)  यांचा मृत्यू झाला असून एकाची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४) यांचा समावेश असून, त्यांच्यावर वसई, नालासोपारा व विरार येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, ६ जणांवर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व