प्रतिनिधी: भूतपूर्व बाजार 'बिगबुल' गुंतवणूकदार व्यवसायिक राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर 'इनसायडर ट्रेडिंग' चे गंभीर आरोप केले आहेत.ऑनलाईन मनी मेकिंग गेमिंगवर स रकारने बंदी आणण्यापूर्वीच रेखा झुनझुनवाला यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आपली गुंतवणूक दोन महिने आधी काढून टाकल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला आहे. याविषयी एक्सवर पोस्ट लिहित त्यांनी संबंधित आरोप केले आहेत. केवळ मोईत्रा नाही तर अ नेक नेटकऱ्यांंनी या गोष्टीवरुन झुनझुनवाला यांच्यावर टीका केली.
त्यांच्या मते 'रेखा झुनझुनवाला यांना या निर्णयाची अधीच कल्पना होती 'असा इनसायडर ट्रेडिंगचा आरोप त्यांच्यावर सुरू आहे. स्वतः राकेश झुनझुनवाला यांनी मृत्यूपूर्वी १८० कोटींची गुंतवणूक गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजीत केली होती. त्यानंतर २०२१ साली कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला होता आता ती एक सूचीबद्ध (Listed) कंपनी आहे. २०२२ साली राकेश झुनझुनवाला यांचा मृत्यू झाला तत्पूर्वी त्यांनी कंपनीमध्ये २०१७ साली १८० कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र सरकारने वाढत्या गैरव्यवहार, व सा माजिक कारणांमुळे ऑनलाईन गेमिंगवर बिल आणत बंदी घातली होती. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्येही मोठे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २०% हून अधिक घसरण झाली होती. मात्र रेखा झुनझुनवाला यांनी मात्र १३ जूनला आपले उ र्वरित भागभांडवल (Stake) विकून टाकले. यापूर्वी रेखा झुनझुनवाला यांनी माहितीप्रमाणे याआधी ६% भागभांडवल वर्षाच्या सुरुवातीला विकले होते. एकूण ७.०६% भागभांडवल झुनझुनवाला यांचे होते. उपलब्ध माहितीनुसार, १२२५ रुपये प्रति शेअर दराने ते जू न महिन्यात विकले आहेत. एकूण ७०० कोटींना उर्वरित हिस्सा झुनझुनवाला यांनी विकला होता.
याच प्रकारणात मोईत्रा यांनी झुनझुनवाला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी याला इनसायडर ट्रेडिंगचे प्रकरण म्हटले आणि म्हटले की जर हे अमेरिकेत घडले असेल तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (ए सईसी) त्याची चौकशी करेल.सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी म्हटले की मोठ्या गुंतवणूकदारांना अशी 'विशेष माहिती' आगाऊ मिळते, ज्यामुळे ते योग्य वेळी नफा कमवू शकतात.परंतु काहींचा असाही विश्वास आहे की हे रेखाची स्मार्ट गुंतवणूक रणनी ती किंवा पोर्टफोलिओ रिबॅलेंसिंग असू शकते, (कोणत्याही चुकीच्या गोष्टीपेक्षा) अशी टीका केली आहे. ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली.गेमिंग विधेयकात रिअल-मनी ऑनलाइन गेमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. २२ ऑग स्टला राष्ट्रपतींची मंजुरी या विधेयकाला मिळाली होती. जुगाराचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि गोपनीयतेशी संबंधित जोखमींपासून लोकांना संरक्षण देणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. ते रिअल-मनी गेम चालवण्यास, त्यांची जाहिरात करण्यास किंवा त्यांच्यासाठी पेमेंट प्रक्रिया करण्यास मनाई करते.