गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोने महाग तर चांदी स्वस्त 'हे' जागतिक एकत्रित परिणाम कमोडिटींचा किंमतीवर सुरू !

मोहित सोमण:आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकात घसरण होऊनदेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर अतिरिक्त टॅरिफ आज लागू झाल्यामुळे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याने आज भारतीय सराफा बाजारात मात्र वाढ झाली आहे. काल सोने स्वस्त झाले असताना गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५५ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रूपये, १८ कॅरेट सोन्या च्या प्रति ग्रॅम दरात ४१ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२०६ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३५५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६६६ रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५५० रूपयां नी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ४१० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०२०६० रूपये, २२ कॅरेटसाठी ९३२५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६५५० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२०६ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३५५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७७४० रूपयांवर आहेत. आज दुपारपर्यंत जागतिक सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत घसरण कायम होती.


संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात मात्र पुन्हा अस्थिरतेच्या तोंडावर ०.२७% वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत जागतिक मानक असलेल्या गोल्ड स्पॉट दरात ०.४०% इतकी वाढ झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ३३७९.११ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याचा निर्देशांक ०.३५% वाढल्याने १००९७२.०० रूपयांवर सोने दरपातळी पोहोचली आहे. सोन्याच्या दरातील वाढत्या चढउताराने भारतीय बाजारात सो न्याच्या दरात अधिक फटका बसला. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची २२ पैशाने घसरण झाली होती. त्यामुळे आज सोन्याच्या दरात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली नाही.


चांदीत मात्र आज घसरण कायम !


आज चांदीच्या दरात मात्र घसरलेल्या मागणीमुळे, घसरलेल्या ईटीएफमधील गुंतवणूकीमुळे आणि विशेषतः युएसमधील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसह टॅरिफ अशांततेमुळे मागणीत घट झाली. व्याजदर कपाताकडे व आगामी युएस पीएमई (Personal Consu mption Expenditure PCE) व जीडीपी आकडेवारीसाठी प्रतिक्षेत असल्याने चांदीतही गुंतवणूकदारांनी आज नकारात्मक प्रतिसाद कायम ठेवला होता. त्यामुळे आज ईटीएफ आणि स्पॉट बेटिंग मागणीत घसरण झाली.


'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १ रूपयांनी, व प्रति किलो दरात १००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १२० रूपये, प्रति किलो दर १२०००० रूपयांवर गेले आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईसह भारता तील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १३०० रूपये, प्रति किलो दर १३०००० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४३% घसरण झाली होती. भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्स बाजा रातील चांदीच्या निर्देशांकात ०.१६% घसरण झाल्याने चांदीची दरपातळी ११५७६३ रूपयांवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान