आगामी काळात ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी

टीमलीज एडटेक अहवालातील माहिती समोर


बंगळुरू, मुंबई आणि चेन्नई नोकरीच्या संधीमध्ये आघाडीवर


मुंबई:टीमलीज एडटेक (TeamLease Edtech) च्या ताज्या करिअर आउटलुक रिपोर्टनुसार या वर्षातील दुस-या सहामाहीत ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स क्षेत्र भारतामध्ये फ्रेशर भरतीचे नेतृत्व करत असून, जुलै–डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी ८८% भरतीचा प्रभावी हेतू दर्शवित आहे. या अहवालात नवख्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या उद्योगांमध्ये भरपूर संधी असल्याचे नमूद केले आहे, जिथे रिटेल (८७%) आणि मॅन्युफॅक्चरिंग (८२%) यांचाही फ्रेशर भरतीसाठी मजबूत हेतू दिसून येतो. शहरांमध्ये बेंगळुरू ८१% भरतीच्या हेतूसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई (६७%) आणि चेन्नई (५९%) यांचा क्रमांक लागतो.माहितीनुसार, जुलै–डिसेंबर २०२५ साठी एकूण फ्रेशर भरतीचा इरादा किंचित घटून ७०% झाला आहे, जो जानेवारी–जून २०२५ च्या तुलनेत ४% नी कमी आहे, तरीही उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये संधी स्थिर आहेत. या बदलामागे एआय-संचालित कार्यबल पुनर्रचना, जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि कोर उद्योगांमध्ये अनुभवी प्रतिभा टिकवून ठेवण्यावर दिला गेलेला धोरणात्मक भर हे प्रमुख घटक आहेत. या अहवालात डिग्री अप्रेंटिससाठी मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले आहे, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग (३७%), अभियांत्रिकी आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२९%) आणि माहिती तंत्रज्ञान (१८%) आघाडीवर आहेत. बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे अनुक्रमे ३७%, ३९% आणि २६% सह अप्रेंटिसशिप भरतीच्या इराद्यांमध्ये आघाडीवर आहेत. लहान संस्था मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत फ्रेशर्सना भरती करण्याबाबत अधिक उत्सुकता दर्शवत आहेत, जरी त्यांची भरती क्षमता मर्यादित आहे.


अहवालातील निरिक्षणावर भाष्य करताना टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शांतनू रूज यांनी सांगितले आहे की,'ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्समधील मजबूत भरतीचा इरादा या क्षेत्राच्या गतिमान वाढीचे द्योतक आहे, ज्यामुळे फ्रेशर्ससाठी अनेक रोमांचक संधी निर्माण होत आहेत. उद्योग जसे-जसे तंत्रज्ञानासह विकसित होत आहेत, तसे-तसे तांत्रिक कौशल्यासह लवचिकता आणि मानवी कौशल्ये असलेल्या फ्रेशर्सना उत्तम संधी प्राप्त होतील. डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्राम्समध्ये झालेली वाढ ही कौशल्याधा रित (Skill Oriented) व्यावहारिक शिक्षण मार्गांची मागणी अधोरेखित करते.'


आयओटी इंजिनिअर, क्लाउड इंजिनिअर, प्रोसेस ऑटोमेशन अ‍ॅनालिस्ट, ज्युनिअर एनएलपी डेव्हलपर, कंटेंट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर अ‍ॅक्चुअरियल अ‍ॅनालिस्ट या भूमिकांसाठी मागणी कायम आहे. कोर डोमेन कौशल्यांमध्ये सायबर सिक्युरिटी, डेटा स्टोरीटेलिंग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, सस्टेनेबल एनर्जी सिस्टिम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, अ‍ॅक्चुअरियल सायन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स आणि परफॉर्मन्स मार्केटिंग यांचा समावेश आहे. संवाद,नैतिक निर्णयक्षमता, सक्रिय ऐकणे, जुळवून घेण्याची वृत्ती, समस्या सोडवणे, सहकार्य, लवचिकता, डिजिटल साक्षरता आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या सॉफ्ट स्किल्सना नियोक्ते (Recruiter) अधिक प्राधान्य देत आहेत असेही अहवालाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारलं नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Venezula Earthquake : फिफा वर्ल्ड कप सुरू असताना स्टार खेळाडूला मोठा धक्का ! भूकंपामध्ये पार्टनरचा..

Venezuela : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Kerala Drug Case : केरळमध्ये अमली पदार्थ तस्करी प्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक

तिरुवनंतपुरम : केरळमधील त्रिशूर येथे अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल