लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत, तर दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लंडनच्या लिफोर्ड भागातील 'इंडियन अरोमा' या रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. काही अज्ञात व्यक्तींनी रेस्टॉरंटला आग लावली, ज्यात पाच लोक जखमी झाले. जखमींपैकी दोन पुरुषांची आणि तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या आगीमागे नेमके काय कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे लंडनमधील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.