Action Construction Equipment कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी थेट ११.५०% शेअर उसळला 'या' कारणांमुळे!

मोहित सोमण:अँक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीच्या शेअरने मोठी उसळी घेतली आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीला ९ ते १०% उसळी शेअरने घेतल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी रॅली झाली आहे. सकाळी ११.५१ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये एनएसईत (National Stock Exchange) मध्ये ११.५०% वाढ झाली आहे. त्यामुळे शेअरची किंमत ११०२ रूपयांवर पोहोचली होती. अँक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (Action Construction Equipment ACE) कंपनीने २९ ऑगस्टला आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) घोषित केली आहे.


अँक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीच्या प्रवर्तक (Promoter) ने आपल्या भागभांडवलात (Stakeholding) वाढ केली आहे. बांधकाम क्षेत्रातील व बांधकाम साहित्यातील या कंपनीच्या प्रवर्तक विजय अग्रवाल यांनी २३०० अतिरिक्त इक्विटी शेअर ओपन मार्केट ऑपरेशन (OMO) माध्यमातून विकत घेतले आहेत. १८ ऑगस्टला या शेअरची खरेदी करण्यात आली असून कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये १९ ऑगस्टला शेअर बाजाराला कळवले आहे. उपलब्ध माहितीनुसार,९४५ रुपये प्रति शेअर या भावाने ही ख रेदी करण्यात आली.


या व्यवहाराचे एकूण मूल्य २१.७३ लाख रुपये होते, जे कंपनीच्या इक्विटीच्या ०.००% आहे. या अधिग्रहणानंतर, सद्यस्थितीत विजय अग्रवाल यांचे शेअर्स ३४२४४४७८ पर्यंत वाढले आहेत. जे कंपनीच्या एकूण इक्विटीच्या २८.७६% आहेत. कंपनीच्या शेअरने ४८% ईपीएस परतावा (Earning per share EPS Return) दिला आहे. गेल्या वर्षी कंपनीने ८.३% वाढ महसूलात नोंदवली होती. सध्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ११७ अब्ज रूपये आहे.या शेअरने गेल्या तीन वर्षांत २९५% परतावा गुंतवणूकीवर परत दिला आहे

Comments
Add Comment

शाळेची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी

नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने