विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा


जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी हजारो जोडपी विवाहबंधनात अडकतात आणि लग्नानंतर विवाह प्रमाणपत्र मिळवणे हे एक महत्त्वाचे कायदेशीर काम असते. मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयात बासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, विवाह नोंदणीची प्रक्रिया आणि त्याचे प्रमाणपत्र हे शनिवार व रविचार वगळता मिळवता येते.


नोकरदारांना रविवारीच सुट्टी असल्याने त्याच दिवशी याबाबतची प्रक्रिया करता येत नसल्याने मुंबईतील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला रविवारीही ही सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीही विवाह नोंदणीची प्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे आता कामावर दांडी मारून आणि नातेवाइकांना सुटी घेण्याची गळ घालावी लागणार नाही.


विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जोडप्यांना अनेकदा तार्सनतास प्रतीक्षा करावी लागते. गेल्या काही महिन्यांपासून विवाह नोंदणी करणाऱ्या जोडप्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे, ज्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला गेला आहे, कार्यालयात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या आहे. ज्यामुळे कामाला विलंब होतो. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तपासणी आणि पडताळणी यात वेळ जातो. अनेक जोडप्यांना एकाच दिवशी काम पूर्ण करणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालमाच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि त्रास वाढतो.


काही प्रमाणात विवाह नोदणीची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असली तरी, कागदपत्रांची पडताळणी आणि अंतिम स्वाक्षरीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची ऑनलाइन अपलोड करण्याची आणि प्राथमिक तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध केल्यास कार्यालयातील गर्दी कमी होईल. अनेक कामांसाठी सोमवार ते शनिवार या दिवसांमध्ये कार्यालये उघड़ी असतात, पण रविवारी सार्वजनिक सुट्टीमुळे विवाह नोंदणी सेवा पूर्णपणे बंद असते. अनेक नवविवाहित जोडपे, जे


आठवड्यातील कामामुळे व्यस्त असतात, त्यांना रविवारीच या कामासाठी वेळ मिळतो. मात्र, महापालिकेची सेवा बंद असल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप होती. अनेक जोडप्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत आणि किमान रविवारच्या दिवशी याची मर्यादित स्वरूपात सेवा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. नागरिकांच्या या मागणीचा विचार करता महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, नागरी सुविधा केंद्र आदींना सूचना करून ही सुविधा रविवारीही खुली ठेवण्याचा सूचना कल्पा आहेत.


Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या