तिसऱ्या घंटेच्या आधी मेकअप उतरवताना...

  29

राजरंग : राज चिंचणकर


रंगभूमीवर नाटकाचा प्रयोग सुरू करण्यापूर्वी संबंधित नाटकमंडळींची खूप लगबग सुरू असते. रंगमंचावर नेपथ्य उभारले जात असते; प्रकाशयोजना सज्ज होत असते; तंत्रज्ञ मंडळी त्यांच्या उपकरणांची जुळवाजुळव करत असतात आणि कलाकार रंगभूषा व वेशभूषा करण्यात मग्न असतात. या सर्वांना तिसऱ्या घंटेची वेळ पाळायची असते. तिसरी घंटा होताच रंगमंचावरचा पडदा दूर होणार असतो आणि कलाकार मंडळी रसिकजनांना सामोरी जाणार असतात. बहुतांश वेळा हे सर्वकाही सुरळीत सुरू असते आणि त्यानंतर प्रयोग यथासांग पार पडतो. पण असे असले तरी, रंगमंचावर कधी काय घडेल याचा नेम नसतो. एकवेळ मानवनिर्मित चुका सुधारता येतात; पण अचानक नैसर्गिक आपत्तीच समोर उभी ठाकली, तर थेट रंगमंचावरच्या अवकाशालाच ‘ब्लॅकआऊट’चे ग्रहण लागते.


या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत पावसाने धुमशान घातले आणि सर्वसामान्यांसह नाट्यसृष्टीवरही त्याचा परिणाम झाला. १९ ऑगस्ट रोजी दुपारी दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये ‘त्या तिघी - स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात वीरांगना’ या पुण्याच्या नाटकमंडळींच्या नाटकाचा प्रयोग लागला होता. याच दिवशी मुंबईत सकाळपासून पावसाने धिंगाणा घालायला सुरुवात केली. बाहेर पावसाने घातलेला धुमाकूळ आणि एकंदरीतच सगळ्या व्यवस्थेचा उडालेला बोजवारा लक्षात घेता, या नाटकाचा नियोजित प्रयोग तिसऱ्या घंटेच्या एक तास आधी रद्द करण्याचा निर्णय संबंधित नाटकमंडळींना नाईलाजाने घ्यावा लागला. साहजिकच, या मंडळींचे चेहरे पार उतरले. हा निर्णय झाल्यावर, रंगमंच व्यवस्था आटोपती घ्यायला सुरुवात झाली; तंत्रज्ञ त्यांची साधनसामग्री पेट्यांमध्ये बंद करू लागले आणि तिसरी घंटा व्हायच्या आधीच कलाकारांवर चेहऱ्यावरचा मेकअप उतरवण्याची वेळ आली.


एकंदर स्थिती पाहिल्यावर, या प्रयोगासाठी या नाटकाच्या टीमसह पुण्याहून मुंबईत आलेली या नाटकाची युवा निर्माती व कलाकार अपर्णा चोथे हिच्या डोळ्यांतून बाहेरचा पाऊस अलगद झिरपून वाहू लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर, तिच्याशी त्याच रंगमंचावर प्रत्यक्ष संवाद साधला असता ती म्हणाली, “अचानक नाटकाचा प्रयोग रद्द होतो, तेव्हा कलाकार म्हणून खूप वाईट वाटते. कारण एखाद्या नाटकाच्या प्रयोगासाठी सर्व गोष्टी जुळवून आणणे जिकिरीचे असते. एक निर्माती म्हणून तर अशा वेळी खूपच फटका बसतो; कारण नाटकाची सगळी टीम आणि सामान आमच्याबरोबर असते. पण निर्मातीपेक्षाही कलाकार म्हणून अशा वेळी क्वचितच खूप वाईट वाटते. कारण प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्नांनिशी उभे असतो. प्रेक्षकांना नाटकाला बोलावलेले असते आणि ते सुद्धा नाटकाला येण्यासाठी आतुर असतात; याची जाणीव आम्हाला असते. पण जेव्हा अशी पावसासारखी नैसर्गिक आपत्ती येते; तेव्हा हतबल व्हायला होते. ‘त्या तिघी - स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात वीरांगना’ या आमच्या नाटकाचा हा ४४ वा प्रयोग होता. नाट्यपंढरी श्री शिवाजी मंदिरमध्ये व दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी प्रयोग करायला मिळणे आणि तो या अशा कारणामुळे रद्द होणे, याचे खूप वाईट वाटले.


पुण्याहून आम्ही मुंबईत प्रयोग करण्यासाठी येण्यापेक्षाही रसिकांसमोर ती कला सादर करता आली नाही, याचे जास्त दुःख आहे. कारण आम्ही कलाकार आहोत आणि कलाकार हा प्रेक्षकांसाठी कुठूनही कुठेही जातोच. त्याबद्दल कलाकारांना कधीच तक्रार नसते. काहीही झाले तरी आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. पण अशा कारणामुळे जेव्हा प्रयोग रद्द होतो; तेव्हा प्रेक्षकांचा सुद्धा भ्रमनिरास होतो. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात आमच्या नाटकाचा हा पहिलाच प्रयोग होता आणि या निमित्ताने एक चांगली आठवण कायमस्वरूपी जपली जाणार होती. मात्र जरी हे आत्ता घडले नाही; तरी पुढेमागे नक्कीच घडेल. पण अशा स्थितीत श्री शिवाजी मंदिरच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हा नवोदित कलाकारांना खूप साथ दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे. असे लोक आणि प्रेक्षक जोपर्यंत नवोदित निर्माते व कलाकारांच्या मागे उभे असतील; तोपर्यंत नाटकाला कधीच वाईट दिवस येणार नाहीत. तूर्तास जरी श्री शिवाजी मंदिरमधला प्रयोग रद्द झाला असला; तरी आम्ही लवकरच आमच्या नाटकाचा प्रयोग इथे सादर करणार आहोत”.

Comments
Add Comment

डायरेक्टर्स ‘अ‍ॅक्टर’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  गोंडस, रुबाबदार असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिकेत विश्वासराव. ‘बेटर - हाफची लव

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागील लेखात घाशीराम कोतवालबाबतचा खराखुरा इतिहास पाहिला. इतिहास हा नाटक, कथा व

आईपणाचा सोहळा

आसावरी जोशी : मनभावन ती आरडओरडा करते. आक्रस्ताळेपणाने थयथयाट करते. तिचे ऐकले नाही की...! आई कशी असते? प्रेमळ, सोशिक,

नात्यांच्या पारंपरिक चौकटींनी साकारलेला चित्रपट ‘बिन लग्नाची गोष्ट’

नात्यांच्या पारंपरिक चौकटींनी साकारलेला आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी

रंगमंचीय नाट्यकलेची कृष्णकळा...

राजरंग : राज चिंचणकर श्री  कृष्ण आणि त्याचे अवतारकार्य हा कायमच औत्सुक्याचा व अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे.

‘वळू’चित्रपटाने बदलली दिशा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक येत नाही, त्यामुळे नाटक पाहता येत नाही, ही खंत आईने व्यक्त