India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी सर्व टपाल सेवा २५ ऑगस्टपासून तात्पुरती बंद केली केली आहेत.


अमेरिका प्रशासनाने ३० जुलै रोजी जारी केलेल्या कार्यकारी आदेश क्र. १४३२४ ची टपाल विभागाने नोंद घेतली आहे. या आदेशानुसार, ८०० अमेरिकन डॉलर पर्यंतच्या वस्तूंवरील शुल्क मुक्त सवलत २९ ऑगस्टपासून मागे घेतली जाणार आहे. परिणामी, किंमत काहीही असो, अमेरिकेसाठी पाठविण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर त्या देशाच्या आयईईपीए (आंतरराष्ट्रीय आपत्कालीन वित्तीय अधिकार कायदा) दररचनेनुसार सीमाशुल्क आकारले जाणार आहे. तथापि, १०० अमेरिकन डॉलर पर्यंतच्या भेटवस्तूंना शुल्कातून सूट लागू राहील.

कार्यकारी आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल नेटवर्कद्वारे मालवाहतूक करणारे परिवहन वाहक किंवा यूएससीबीपी (अमेरिकन अबकारी आणि सीमा संरक्षण) मान्यताप्राप्त पात्र संस्था यांना टपाल पार्सलवरील शुल्क वसूल करून जमा करण्याची जबाबदारी आहे. यूएससीबीपीने १५ ऑगस्ट रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी पात्र संस्थांची नेमणूक तसेच शुल्क वसुली व रेमिटन्स यंत्रणा अद्याप स्पष्ट झालेली नाही. परिणामी, कार्यात्मक व तांत्रिक तयारीअभावी, अमेरिकेकडे जाणाऱ्या हवाई कंपन्यांनी २५ ऑगस्टनंतर टपाल पार्सल स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, टपाल विभागाने २५  ऑगस्टपासून अमेरिकेसाठी जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पत्रे/दस्तऐवज व १०० अमेरिकन डॉलर पर्यंतच्या भेटवस्तू या अपवादात्मक श्रेणीत येतील व त्यांची नोंदणी सुरू राहील. या वस्तू यूएससीबीपी व यूएसपीएस कडून पुढील स्पष्टीकरण मिळेपर्यंत अमेरिकेला पाठविण्यात येतील.

टपाल विभाग या बदलत्या परिस्थितीवर सर्व संबंधित हितधारकांशी समन्वय साधत सतत लक्ष ठेवून आहे आणि सर्व सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ज्या ग्राहकांनी अशा वस्तूंचे बुकिंग आधीच केले आहे, त्या सद्यस्थितीत अमेरिकेला पाठविता येणार नाही, ते ग्राहक टपाल शुल्क परत घेऊ शकतात. तसेच टपाल विभाग ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून अमेरिकेला जाणारी पूर्ण टपाल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे,असे टपाल विभागाने कळवले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे