स्पर्धकांनंतर आता बिग बॉस १९ चे ब्रँड स्पॉन्सर्स निश्चित

  31

प्रतिनिधी:लवकरच हेवी एंटरटेनमेंट लोकप्रिय ड्रामा बिग बॉस १९ छोट्या पडद्यावर परतत आहे. २४ ऑगस्टला हा शो जिओ हॉटस्टार, कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या हाय व्होल्टेज ड्रामा कार्यक्रमसाठी स्पर्धकांची यादी निश्चित झाल्यानंतर आता कार्य क्रमांना प्रायोजकही निश्चित आहेत. Vasline, Appy Fizz, Danube Properties, Flipkart, Citroen, Silver Coin Atta, Manforce, Lakme Peach Milk, Haier हे कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याचे निश्चित झाले आहे. Vaseline हा कार्यक्रमाचा को टाय टल स्पॉन्सर असल्याचे निश्चित झाले आहे. तर इतर बाकीचे स्पॉन्सरही ऑन बोर्ड झाले आहेत. जिओस्टारचे महसूल प्रमुख महेश शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे,' बिग बॉस हा भारतातील सर्वात प्रभावशाली रिअँलिटी शो फॉरमॅट आहे, जो जाहिरातदारांना अतुलनीय पो होच देतो आणि त्यात अखंड एकत्रीकरण आहे'. ब्रँड्सना नैसर्गिकरित्या त्याच्या कथेत समाविष्ट करण्याची या शोची क्षमता मार्केटर्ससाठी एक उच्च-स्तरीय प्लॅटफॉर्म बनवते.' तसेच शेवटच्या सिझन १८ ला आकडेवारीनुसार, कार्यक्रमाला २०५ दशलक्ष प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रत्येक सिझन नुसार ती बदलत गेली आहे. मागील सिझनचा अपयशामुळे बिग बॉसने यंदा जय्यत तयारी केली आहे.


ब्रँडच्या बाबतीत विचार केल्यास ब्रँडला या कार्यक्रमाच्या प्रायोजकत्वात चांगला महसूल अपेक्षित आहे. सह-प्रस्तुतीकरण प्रायोजक म्हणून व्हॅसलीन आपल्या जाहीरातीतून स्किनकेअर नवोन्मेष आणि महिला सक्षमीकरणावर आपले लक्ष केंद्रित करत आहे तर अ‍ॅ पी फिझ शोच्या उत्साही वातावरणाचा फायदा घेत त्याची तरुण, ताजीतवानी ब्रँड ओळख बळकट करते. डॅन्यूब प्रॉपर्टीज ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी बिग बॉस शोच्या आंतरराष्ट्रीय पोहोचचा फायदा करून वापर भारतीय बाजारात प्रवेश करण्यासाठी इच्छु क आहे. दरम्यान सिट्रोएनने आपल्या ब्रँड कॅम्पेनसाठी भारतीय ग्राहकांशी भावनिक कनेक्ट करण्यासाठी निर्माण करण्यासाठी 'शिफ्ट इन द न्यू' मोहिमेचा वापर सुरू केला आहे.


सिल्व आणि फ्लिपकार्ट सुद्धा भारतातील महत्वाचा कॉमर्स ब्रँड आहे जो आगामी उत्पादनांच्या धोरणात्मक विक्रीसाठी या व्यासपीठाचा वापर करेल अशी शक्यता आहे.हर कॉइन अट्टा, मॅनफोर्स, लॅक्मे पीच मिल्क आणि हायर सारखे सहाय्यक प्रायोजक एफएम सीजी, वैयक्तिक काळजी (Personal Care) आरोग्य आणि घरगुती उपकरणांच्या श्रेणींमध्ये शोचे व्यापक ग्राहक आकर्षण प्रतिबिंबित करतात.वहब्बीज दोराबजी, धीरज धूपर, पायल गेमिंग, आवेज दरबार नगमा मिरजकर, गौरव खन्ना हे निश्चित झाले आहेत .या सीझनमध्ये 'घरवालों की सरकार' ही एक अभूतपूर्व राजकीय थीम यावेळी शोसाठी निश्चित झाली आहे.

Comments
Add Comment

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह