सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातपिके आडवी

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हळवी पिके हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी विभागाने अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली नाही, मात्र शेकडो एकरवरील हळवी भातपिकांचे नुकसान होऊ लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.९) दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोपून काढले आहे. सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय जिल्ह्यात उर्वरित भागाला देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. उभी पिके आडवी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड आहे.

त्यातील ५ ते ६ हजार हेक्टर भातपिकाची पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आली होती. हे पीक महिनाभरापूर्वीच परिपक्व झालेले आहे. सततच्या पावसामुळे हे पीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने सप्टेंबर अखेरीपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहे. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. असे असले तरी शेकडो एकर भातपिकांचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे.
Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ